शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

औरंगाबाद मतदारसंघात ३७ उमेदवार रिंगणात; ३ ईव्हीएममुळे वाढले प्रशासनाचे टेन्शन

By विकास राऊत | Published: April 30, 2024 12:13 PM

आता रणधुमाळी सुरू, शिंदेसेना, उद्धवसेना आणि एमआयएम प्रामुख्याने हीच लढत असणार आहे. २०१९च्या निवडणुकीत ‘नोटा’सह २४ उमेदवार मैदानात होते.

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात बहुरंगी निवडणूक होणार आहे. सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ७ उमेदवारांनी मैदानातून माघार घेतली. छाननीअंती ४४ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप स्वामी यांनी सर्व उमेदवारांना चिन्हांचे वाटप केल्यानंतर निवडणूक मैदानात ‘नोटा’सह ३८ उमेदवार रिंगणात असतील, असे नमूद केले.

पत्रकारांशी बोलताना स्वामी यांनी सांगितले, उमेदवारांची संख्या पाहता तीन ईव्हीएम प्रत्येक मतदान केंद्रावर लागणार असून, प्रशासनाने तयारी केली आहे. दुपारी २:४५ वाजता शेवटचा उमेदवार अर्ज मागे घेण्यासाठी आला. जबरदस्तीचा प्रकार कुठेही घडला नाही. स्वत: उमेदवार माघार घेण्यासाठी आले होते. राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांचे राखीव असलेले चिन्ह त्यांना देण्यात आले. नोंदणीकृत पक्षांना त्यांचे चिन्ह दिले. काही उमेदवारांना सोडत काढून चिन्ह देण्यात आले. दरम्यान, ‘नोटा’सह ३८ उमेदवार रिंगणात असल्यामुळे प्रशासनाचे टेन्शन वाढले आहे. शिंदेसेना, उद्धवसेना आणि एमआयएम प्रामुख्याने हीच लढत असणार आहे. २०१९च्या निवडणुकीत ‘नोटा’सह २४ उमेदवार मैदानात होते.

दररोज १ लाख ७० हजार मतदारांपर्यंत जावे लागणार११ मेरोजी सायंकाळी ५ वाजता प्रचार तोफा थंडावतील. ३० एप्रिलपासून १२ दिवस प्रचारासाठी उरले आहेत. मैदानात असलेल्या उमेदवारांना रोज किमान १ लाख ७० हजार मतदारांपर्यंत पोहोचावे लागेल.

कोणत्या चिन्हासाठी लागली स्पर्धाॲाटो रिक्षा, कपाट, रोड रोलर या चिन्हांसाठी सर्वाधिक मागणी होती. सोडतीला लहानगा न भेटल्यामुळे मीच डोळे बंद करून चिन्हाची चिठ्ठी काढली. तुतारी हे चिन्ह देखील उमेदवाराला देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी स्वामी यांनी नमूद केले.

निकाल उशिरा लागणार१३ मेरोजी मतदान झाल्यानंतर ४ जूनला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. उमेदवार जास्त असल्यामुळे ३८ वेळा बॅलेट युनिटचा बझर वाजेल. फेऱ्यांची संख्या वाढेल. मॉकपोल ३८ वेळा करावे लागेल, असे स्वामी म्हणाले.

बॅलेट पेपरच्या छपाईला सुरुवात२९ रोजी सायंकाळी सात वाजेनंतर बॅलेट पेपरच्या छपाईला सुरुवात केली. लष्करातील सैनिकांसह हर्सूल कारागृहातील आरोपी, घरून मतदान प्रक्रिया, मतदान प्रक्रियेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे बॅलेट पेपरद्वारे मतदान घेतले जाणार आहे.

६ हजार १२० ईव्हीएम लागणार...६ हजार १२० ईव्हीएम औरंगाबाद मतदारसंघात लागणार आहेत. तर जालना मतदारसंघातील तीन विधानसभा क्षेत्रात ३१३५ ईव्हीएम लागणार आहेत.

मैदानातील उमेदवार.................................पक्षचंद्रकांत भाऊराव खैरे................. उद्धवसेनासंदीपान आसाराम भुमरे................ शिंदेसेनासय्यद इम्तियाज जलील................ ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनसंजय उत्तमराव जगताप...................बहुजन समाज पार्टीहर्षवर्धन रायभान जाधव..................अपक्षमनीषा खरात............................... बहुजन महाराष्ट्र पार्टीसुरेश आसाराम फुलारे........................ अपक्षखाजा कासीम शेख......................... अपक्षबबनगीर उत्तमगीर गोसावी............... हिंदुस्थान जनता पार्टीदेविदास रतन कसबे....................... अपक्षजगन्नाथ किसन उगले..................... अपक्षअरविंद किसनराव कांबळे.................. बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीअब्दुल अजीम अब्दुल अजीज शेख............ अपक्षरवींद्र भास्करराव बोडखे.....................भारतीय युवा जन एकता पार्टीसंजय भास्कर शिरसाट..................... अपक्षसुरेंद्र दिगंबर गजभारे............................अपक्षप्रतीक्षा प्रशांत चव्हाण...................... आंबेडकरवादी रिपब्लिकन पक्षजगन्नाथ खंडेराव जाधव...................... अपक्षवसंत संभाजी भालेराव.....................प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टीपंचशीला बाबूलाल जाधव................ रिपब्लिकन बहुजन सेनासंगीता गणेश जाधव...................... अपक्षनितीन पुंडलिक घुगे............................ अपक्षनारायण उत्तम जाधव........................पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक)मीनासिंग अवधेशसिंग सिंग.................. अपक्षप्रशांत पुंडलिकराव आव्हाळे..................अपक्षमधुकर पद्माकर त्रिभुवन...................... अपक्षमनोज विनायकराव घोडके................. अपक्षडॉ. जीवनसिंग भावलाल राजपूत....................अपक्षभरत पुरुषोत्तम कदम............................ राष्ट्रीय मराठा पार्टीअर्जुन भगवानराव गालफाडे........................ राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीसंदीप देविदास जाधव............................ अपक्षलतीफ जब्बार खान.......................... अपक्षसंदीप दादाराव मानकर......................अपक्षअब्दुल समद बागवान......................... एआयएमआयएम (आयएनक्यू)भानुदास रामदास सरोदे ................... अपक्ष

मैदानातून माघार घेतलेले उमेदवार...विश्वास पंडित म्हस्के, पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक)किरण सखाराम बर्डे, अपक्षखान एजाज अहमद, अपक्षगोरखनाथ राजपूत राठोड, अपक्षजियाउल्लाह अकबर शेख, अपक्षमोहम्मद नसीम शेख, अपक्षसाहेबखान यासिनखान पठाण, अपक्ष

टॅग्स :aurangabad-pcऔरंगाबादlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४