शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
3
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
4
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
5
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
6
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
7
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
9
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
10
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
11
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
12
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
13
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
14
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
15
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
16
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
17
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
18
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
19
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
20
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी

नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी आले ३८४ कोटी; आता चिंता मनपाच्या ८२२ कोटींच्या वाट्याची

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 8:10 PM

मनपाच्या वाट्याची रक्कम कर्ज स्वरूपात घेतली तरी मनपाला हफ्ते भरणे अवघड आहे.

छत्रपती संभाजीनगर : निधी संपल्यामुळे नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामावर परिणाम होण्याची शक्यता होती. परंतु केंद्र आणि राज्य शासनाकडून सोमवारी तब्बल ३८४ कोटी २२ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला. २७४० कोटी रुपयांच्या योजनेत मनपाला ८२२ कोटींचा वाटा टाकायचा आहे. ही रक्कम राज्याकडून अनुदान स्वरूपात मिळावी, यासाठी मनपाने नव्याने प्रयत्न सुरू केले आहेत.

मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी सांगितले की, केंद्र शासनाने १३७ कोटी २४ लाख ४९ हजार ९८० रुपये तर राज्य शासनाचे २४६ कोटी ९८ लाख २० रुपये असे एकूण ३८४ कोटी २२ लाख ४९ हजार रुपये सोमवारी संध्याकाळी मनपाच्या खात्यात जमा केले. त्यामुळे आणखी काही महिने योजनेला निधीची कमतरता भासणार नाही. मनपाच्या वाट्याची रक्कम कर्ज स्वरूपात घेतली तरी मनपाला हफ्ते भरणे अवघड आहे. त्यामुळे अनुदान स्वरूपात रक्कम मिळावी, अशी मागणी शासनाकडे केली. मंत्रिमंडळ बैठकीसमोर योजनेच्या कामाचे व्हिडीओ चित्रीकरण सादर केले जाईल. आतापर्यंत केंद्र आणि राज्य शासनाकडून १४२४ कोटी १७ लाख रुपये आले. त्यातील १४१५ कोटी रुपये खर्च झाले आहेत.

-योजनेचा एकूण खर्च -२७४० कोटी रुपये-केंद्र शासन हिस्सा: २५ टक्के (६८५ कोटी १९ लाख)-राज्य शासन हिस्सा: ४५ टक्के (१२३३ कोटी ३४ लाख) -महापालिकेचा हिस्सा: ३० टक्के (८२२ कोटी २२ लाख)

केंद्र शासनाने हिश्यातील ५०८ कोटी ४७ लाख व राज्य शासनाने ९१५ कोटी ६९ लाख रुपये निधी दिलेला आहे. मनपाने वाटा टाकलेला नाही.शासन.......एकूण हिस्सा.....दिलेला निधी.....प्रलंबित निधी (आकडे कोटीत)केंद्र.............६८५................६४६.............३९राज्य.......१२३३...................११६१.............७२मनपा........८२२...................०.००..............८२२.

टॅग्स :WaterपाणीAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका