लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : चिकलठाणा येथे पीटलाइन करण्यासाठी ११ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. रेल्वे बोर्डाकडून मंजुरी मिळाल्यानंतर वर्षभरात पीटलाइनचे काम पूर्ण होईल. या एका पीटलाइनमुळे किमान तीन ते चार नव्या रेल्वे सुरू होतील, अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विनोदकुमार यादव यांनी गुरुवारी येथे दिली.यादव यांनी औरंगाबाद आणि चिकलठाणा रेल्वेस्टेशनला भेट देऊन सुविधांची पाहणी केली. या पाहणीनिमित्त पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. औरंगाबादहून दिल्ली, मुंबईसाठी नव्या रेल्वे सुरू होण्याची मागणी होत आहे. नवीन रेल्वे सुरूकरताना सुरक्षेच्या दृष्टीने देखभाल-दुरुस्ती महत्त्वाची आहे. पूर्णा येथील पीटलाइनवरून देखभाल-दुरुस्ती करून रेल्वे औरंगाबादला आणणे शक्य नाही. त्यामुळे चिकलठाणा येथे पीटलाइन केली जात असून त्यासाठी जमीन, रेल्वे कनेक्टिव्हिटी आणि पाण्याची सुविधा आहे. यासंदर्भात रेल्वे बोर्डाला प्रस्ताव पाठविला असून पुढील वर्षापर्यंत तो मार्गी लागेल,असे यादव म्हणाले.मनमाड-परभणी मार्गाच्या दुहेरीकरणाचे सर्वेक्षण झाले आहे. सर्वेक्षण सकारात्मक असून त्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाला पाठविला जाईल. मॉडेल रेल्वेस्टेशनच्या दुसºया टप्प्याचे काम सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. ३४ टक्के अपघात रेल्वे क्रॉसिंगवर होतात. वक्तशिरपणापेक्षाही सुरक्षेला अधिक प्राधान्य देत आहोत. त्यामुळे मानवरहित रेल्वेगेट बंद केले जाणार आहे,असेही त्यांनी सांगितलेप्रारंभी खा. चंद्रकांत खैरे यांच्या उपस्थितीत महाव्यवस्थापक विनोदकुमार यादव, नांदेड विभागाचे व्यवस्थापक विनोदकु मार यादव आदी रेल्वे अधिकारी, मनपा व अन्य विभागाच्या अधिकाºयांची बैठक झाली. यापूर्वी अनेकदा झालेल्या बैठकींप्रमाणेच ही बैठक झाले. तिच प्रश्न आणि तिच उत्तरे दिली जात होती.
पीटलाइनमुळे ४ नव्या रेल्वे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 12:27 AM