रामेश्वर काकडे । लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : खरीप हंगामाच्या पेरणीला गत आठवडाभरापासून सुरुवात झाली असून जिल्ह्यातील सात तालुक्यांत २३ जूनपर्यंत सरासरी १९ टक्के पेरणी झाल्याची कृषी विभागाकडे नोंद आहे़ प्रत्यक्षात जिल्ह्यात ४० ते ४५ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. जिल्ह्यात यावर्षीच्या खरीप हंगामासाठी एकूण ८ लाख २४ हजार ८०० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. त्यात खरीप ज्वारीसाठी १ लाख १२ हजार ३०० हेक्टर, उडीद-५० हजार ३०० हेक्टर, मूग-२९ हजार ९०० हेक्टर, तूर- ६९ हजार ८०० हेक्टर, सोयाबीन-१ लाख ९९ हजार हेक्टर तर कापसासाठी ३ लाख २३ हजार ७०० हेक्टर क्षेत्र पेरणीसाठी प्रस्तावित आहे. त्यापैकी ज्वारी १७०० हेक्टर, उडीद २२०० हेक्टर, मूग २२०० हेक्टर, तूर ३१०० हेक्टर, सोयाबीन १६ हजार १०० हेक्टर तर कापसाची ३४ हजार ३०० हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे. याप्रमाणे जिल्ह्यात एकूण ६० हजार हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. सदर पेरणी नांदेड तालुका- २८०० हेक्टर १० टक्के, लोहा- १६ हजार ६०० ेहेक्टर १० टक्के, भोकर- २०९०० हेक्टर ३० टक्के, देगलूर- ७५०० हेक्टर २० टक्के, मुखेड- २३०० हेक्टर १० टक्के, हिमायतनगर- ९४०० हेक्टर ३० टक्के तर नायगाव तालुक्यात ९ हजार ९०० हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. असा पेरणीचा अहवाल कृषी विभागाकडे असला तरी प्रत्यक्ष पेरणी मात्र जास्त हेक्टरवर झाली आहे. मात्र आजपर्यंत बिलोली, मुखेड, कंधार, हदगाव, कनवट, माहूर, धर्माबाद, उमरी व अर्धापूर तालुका कृषी अधिकाऱ्यांनी अद्यापही पेरणीचा अहवाल जिल्हा अधिक्षक कार्यालयाकडे पाठविलाच नाही. त्यामुळे सदर तालुक्यात पेरणी झाल्याचा अहवाल निरंक आहे़ प्रत्यक्षात वरील तालुक्यात ३० ते ४० टक्के पेरणी पूर्ण झालेली आहे. गतवर्षी २३ जूनपर्यंत विविध पिकांची ८ टक्के पेरणी झाली होतीे. ७ लाख ५४ हजार ६०० हेक्टर प्रस्तावित क्षेत्रापैकी ६१ हजार १०० हेक्टरवर पेरणी झाली होती. जिल्ह्यात भात,ज्वार,बाजरी,मका या तृण धान्यासाठी १ लाख ५१ हजार ५०० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित होते,तृणधान्याची १७०० हेक्टरवर पेरणी झाली होती. तर तुर, मूग, उडीद या कडधान्याचे १ लाख ४८ हजार ४०० हेक्टर प्रस्तावित क्षेत्रापैकी ११२०० हेक्टरवर पेरणी झाली होती. तीळ, कारळ, सूर्यफूल, सोयाबीन या गळीत धान्यासाठी १ लाख ८२ हजार ५०० हेक्टर प्रस्तावित क्षेत्रापैकी १७ हजार ७०० हेक्टरवर पेरणी झाली होती. सोयाबीनसाठी १ लाख ७२ हजार २०० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित होते तर त्यापैकी १७ हजार ६०० हेक्टरवर पेरणी झाली होती. कापसासाठी २ लाख ५० हजार ४०० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित होते. तुरीसाठी ६० हजार ५०० हेक्टर होते. या हंगामात सोयाबीनचे २८ हजार हेक्टर तर कापसाचे ७३ हजार हेक्टर क्षेत्र जास्तीचे प्रस्तावित आहे. दरम्यान, मागील पाच, सहा दिवसापासून पावसाने ओढ दिल्यामुळे पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले होते़ पावसाने विश्रांती घेतल्यामुळे दुबार पेरणीचे संकट येणार की काय, अशी भीती व्यक्त होत होती़ परंतु शुक्रवारी सायंकाळी पावसाचे आगमन झाले़
जिल्ह्यात ४० टक्के पेरणी
By admin | Published: June 24, 2017 12:15 AM