लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरातील १५ केंद्रावरून २२ जुलै रोजी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात आली. परीक्षा केंद्राची फिरतेपथकाद्वारे पाहणी करण्यात आली. २२ जुलै रोजी प्रथम पेपर सकाळी १०.३० ते दुपारी १ या यावेळेत घेण्यात आला. तर दुसरा पेपर दुपारी २ ते ४.३० वाजता झाला. परीक्षेसाठी एकूण ४२११ जणांनी अर्ज केले होते. त्यापैकी ४०२५ परीक्षार्थीनीं टीईटीची परीक्षा दिली. परीक्षा केंद्रावर नियंत्रणासाठी दोन पथके तैनात होती. जिल्हाधिकारी अनिल भंडारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ए. एम.देशमुख, शिक्षणाधिकारी प्रा. शिवाजी पवार शिक्षणाधिकारी मा. दीपक चवणे, यांनी परीक्षा केंद्रांना भेटी देऊन परीक्षेची पाहणी केली. प्रथम पेपर हिंगोली शहरातील आदर्श विद्यालय, स्व. अमृतराव देशमुख अध्यापक विद्यालय, शंकरराव चव्हाण उर्दू हायस्कूल, सेक्रेट हार्ट इंग्लिश हायस्कूल, खुराणा कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज, शिवाजी महाविद्यालय, आदर्श महाविद्यालय, जि. प. कन्या प्रशाला केंद्रावरून घेण्यात आली. तर दुसरा पेपर आदर्श विद्यालय, स्व. अमृतराव देशमुख डिएड कॉलेज, सरजूदेवी आर्य कन्या विद्यालय, खुराणा-सावंत इंजिनिअरींग कॉलेज, शिवाजी महाविद्यालय, आदर्श महाविद्यालय केंद्रावरून घेण्यात आला.
४०२५ विद्यार्थ्यांनी दिली ‘टीईटी’ परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 12:35 AM