औरंगाबाद : एका कुटुंबाने वडिलोपार्जित दीड एकर जमीन २ कोटी रुपयांमध्ये दोन बांधकाम व्यावसायिकांना विकून इसार म्हणून ४१ लाख ५० हजार रुपये घेतले; परंतु नंतर त्यांनी त्या जमिनीचे खरेदीखत करून न देता त्यांची फसवणूक केली. सिडको पोलिसांनी गुन्हा दाखल करून ७ आरोपींपैकी ५ जणांना मंगळवारी रात्री अटक केली. न्यायालयाने त्यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.भूषण देवीदास शिरोळे (३६, रा. सिडको एन-५) व सुरेश सखाराम शिंगारे हे दोघे बांधकाम व्यावसायिक असून, शहरात प्लॉटिंग व जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. हे दोघे अनिल नारायण कुलकर्णी, आरती अनिल कुलकर्णी, अजिंक्य अनिल कुलकर्णी, अमित अनिल कुलकर्णी यांना सुंदरवाडी भागातील जमिनीच्या व्यवहाराबद्दल भेटले. त्यावेळी अनिल कुलकर्णी म्हणाले की, ‘‘पत्नी आरती कुलकर्णी यांच्या हिश्श्यात वडिलोपार्जित दीड एकर जमीन आहे; परंतु सुमीत कुलकर्णी आणि वर्षा कुलकर्णी यांनी पत्नीच्या खोट्या स्वाक्षऱ्या करून आणि तलाठ्याला हाताशी धरून जमिनीच्या सातबाºयावरून नाव कमी केले आहे.’’ शिरोळे आणि शिंगारे यांनी कागदपत्रांची पाहणी केल्यानंतर ही जमीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आणि तहसीलदारांकडे सातबाºयावर नाव लावण्यासाठी अर्ज करण्यासाठी कुलकर्णी यांना सांगितले. शिरोळे आणि शिंगारे यांनी जमीन मालक आरती कुलकर्णी, अनिल कुलकर्णी, अजिंक्य कुलकर्णी आणि अमीत कुलकर्णी यांच्यासोबत २ कोटी रुपयांचा सौदा केला. ८ मे २०१८ मध्ये जमिनीची खरेदी इसारपावती करारनामा केल्यानंतर विविध मार्गाने ४१ लाख ५० हजार रुपये दिले. जमीन आरती कुलकर्णी यांच्या नावावर होताच त्याचे खरेदीखत शिरोळे आणि शिंगारे यांच्या नावाने करण्याचे करारात नमूद होते. तहसीलदारांसमोर या वादाची सुनावणी होऊन २० फेब्रुवारी २०१९ रोजी आरती कुलकर्णी यांचे नाव सातबाºयात समाविष्ट करण्याचे आदेश झाले.
जमिनीच्या व्यवहारात ४१ लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 11:36 PM
एका कुटुंबाने वडिलोपार्जित दीड एकर जमीन २ कोटी रुपयांमध्ये दोन बांधकाम व्यावसायिकांना विकून इसार म्हणून ४१ लाख ५० हजार रुपये घेतले; परंतु नंतर त्यांनी त्या जमिनीचे खरेदीखत करून न देता त्यांची फसवणूक केली. सिडको पोलिसांनी गुन्हा दाखल करून ७ आरोपींपैकी ५ जणांना मंगळवारी रात्री अटक केली. न्यायालयाने त्यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
ठळक मुद्देपाच जणांना अटक, दोघे पसार : सिडको ठाण्यात गुन्हा दाखल, तीन दिवस पोलीस कोठडी