शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक दिवस! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
रेल्वे कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची मोठी भेट! नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बोनस मंजूर, मिळणार 'इतकी' रक्कम! 
3
"आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस’’, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
4
अखेर सापडलं सोन्याचं घुबड, ३१ वर्षांपासून शोघ घेत होता संपूर्ण देश, नेमकं कारण काय?  
5
धक्कादायक! घरात घुसून पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची हत्या; CM योगींनी दिले कारवाईचे आदेश
6
केकमुळे कॅन्सरचा धोका! अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाच्या अहवालात मोठा खुलासा
7
एक दोन नव्हे, तब्बल 7 आघाड्यांवर युद्ध लढतोय चिमुकला इस्रायल; जाणून घ्या, ज्यूंचे शत्रू कोण कोण?
8
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
9
Sangli: शरद पवारांच्या दौऱ्याने सांगलीत भाजपला मोठा धक्का; राजेंद्रअण्णा देशमुख पवार गटात
10
वैवाहिक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
11
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
12
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
13
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
14
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
15
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
17
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार
18
"त्याचा लहान भाऊ म्हणून...", छोटा पुढारीने सूरज चव्हाणबाबतीत दिला मोठा शब्द
19
Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते विधानसभेच्या रिंगणात, आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढणार!
20
महाराष्ट्रातील क्रीडारत्नांचा सन्मान! अविनाश साबळेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, प्रदीप गंधेंना 'जीवन गौरव'

‘विश्वकर्मा’ योजनेत छत्रपती संभाजीनगरात २५ हजार अर्ज निव्वळ शिलाई मशीनसाठी

By मुजीब देवणीकर | Published: October 03, 2024 6:15 PM

कर्ज स्वरूपात ही योजना असताना निव्वळ शिलाई मशीन मिळेल म्हणून शिंपी या प्रवर्गात २५ हजार महिलांनी अर्ज केले आहेत.

छत्रपती संभाजीनगर : प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजने शहरातील महिलांनी महापालिकेच्या प्रकल्प विभागाकडे ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने तब्बल ४१ हजार अर्ज दाखल केले. अर्जांची संख्या पाहून अधिकारीही चक्रावले आहेत. योजना १८ पगड जातींच्या नागरिकांना आपला पारंपरिक व्यवसाय अधिक बळकट करण्यासाठी आहे. कर्ज स्वरूपात ही योजना असताना निव्वळ शिलाई मशीन मिळेल म्हणून शिंपी या प्रवर्गात २५ हजार महिलांनी अर्ज केले आहेत.

महापालिकेच्या प्रकल्प विभागांतर्गत प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना राबविण्यात येत आहे. योजनेत १८ पगड जातीच्या नागरिकांना पारंपरिक व्यवसाय करणाऱ्यांना अगोदर डीआयसीमार्फत प्रशिक्षण दिले जाईल. दररोज ५०० रुपये प्रशिक्षण भत्ता दिला जाईल. दुसरे प्रशिक्षण १५ दिवसांचे राहील. त्यातही ५०० रुपये भत्ता राहील. व्यवसाय करण्यासाठी किट दिले जाणार आहे. या शिवाय १ लाख रुपयांपर्यंत ५ टक्के व्याजाने कर्जही उपलब्ध करून दिले जाणार आहे. कर्जाची परतफेड केल्यास २ लाख रुपये दुसरे कर्ज मिळेल. या योजनेत मोफत शिलाई मशीन मिळणार ही अफवा पसरविण्यात आली. शहराच्या वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या महिला आजही मोठ्या संख्येने मनपात येऊन पाचशे ते हजार रुपये खर्च करून ऑनलाइन अर्ज भरत आहेत. मनपात येऊन ऑफलाइन अर्जही दाखल करीत आहेत.

१८ पगड जाती कोणत्या?कुंभार, सुतार, लोहार, चांभार, माळी, तेली, न्हावी, परीट-धोबी, बोट बनविणारा, शस्त्र कारागीर, कुलूप तयार करणारा-दुरुस्ती करणारा, सोनार, शिल्पकार-दगड कोरणारा, गवंडी, बास्केट-चटई-झाडू बनविणारा-कॉयर विणकर, बाहुली-खेळणी बनविणारा, शिंपी, मासे पकडायचे जाळे बनविणारा.

२५ हजार अर्ज शिंपी प्रवर्गातशिंपी प्रवर्गात महापालिकेकडे २५ हजार अर्ज आले आहेत. प्रत्येक अर्जावर मोफत शिलाई मशीन द्यावी, असा उल्लेख महिलांनी केला आहे. अन्य प्रवर्गात २२१४ हजार अर्ज आले आहेत.

प्राप्त अर्जांचा तपशील४१०५३- प्राप्त अर्ज१४१५८- तपासणी अर्ज६४१५- विविध योजनांचा लाभ घेतला७७४३- नाकारण्यात आलेले अर्ज२६८९५- तपासणीस प्रलंबित अर्ज२४६८१- शिंपी प्रवर्गातील अर्ज२२१४- इतर प्रवर्गातील अर्ज

अर्जांची तपासणी सुरूशासन निर्देशानुसार वॉर्ड कार्यालयाकडून संबंधित अर्जांची तपासणी करून घेण्यात येत आहे. त्यानंतर शासनाच्या पुढील निर्देशानुसार कारवाई केली जाईल.- अंकुश पांढरे, उपायुक्त मनपा.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका