जालना : जिल्हा पोलिस दलाकडून पोलिस सुरू असलेल्या पोलिस शिपाई भरतीच्या आजच्या तिसऱ्या दिवशी मैदानी चाचणीसाठी बोलाविण्यात आलेल्या ७५० उमेदवारांपैकी ५५७ उमेदवार मैदानी चाचणीसाठी आले होते. त्यापैकी ४१८ उमेदवार चाचणीत फिट ठरले असल्याची माहिती पोलिस अधिक्षक ज्योतीप्रिया सिंग यांनी दिली.शिपाई भरतीची प्रक्रिया मंगळवारपासून येथील राज्य राखीव पोलिस दलाच्या मैदानावर सुरू झाली. भरती प्रकियेचा आजचा तिसरा दिवस होता. ५५७ उमेदवारांपैकी ४१८ उमेदवारांनी मैदानी चाचणी यशस्वीपणे पूर्ण केली. या भरती प्रक्रियेसाठी पोलिस शिपाई पदासाठी मंगळवारपासून राज्य राखीव दलाच्या मैदानावर चाचणीला सुरूवात होणार आहे. २७ शिपाई पदांसाठी तब्बल ५ हजार ३३८ अर्ज आले आहेत. त्यात ३ पदे महिलांसाठी राखीव आहेत.
४१८ उमेदवार मैदानी चाचणीस पात्र
By admin | Published: April 01, 2016 12:40 AM