औरंगाबाद : जिल्ह्यात रविवारी दिवसभरात ४२६ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आणि १६४ जण कोरोनामुक्त झाले. उपचार सुरू असताना जिल्ह्यातील तीन आणि अन्य जिल्ह्यातील दोन रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या ३,२१८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या आता ५२ हजार ९६९ झाली आहे, तर आतापर्यंत ४८ हजार ४५९ रुग्ण कोरोनामुक्त झाले. एकूण १,२९२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या ४२६ रुग्णांत मनपा हद्दीतील ३४८, तर ग्रामीण भागातील ७८ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील १०९ आणि ग्रामीण भागातील ५५, अशा एकूण १६४ रुग्णांना रविवारी सुटी देण्यात आली. उपचार सुरू असताना मायानगरातील ६६ वर्षीय पुरुष, एन-सहा, सिडकोतील ३६ वर्षीय पुरुष, केळीबाजारातील ८२ वर्षीय पुरुष, परभणी जिल्ह्यातील ६५ वर्षीय महिला, जालना जिल्ह्यातील ८५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.
मनपा हद्दीतील रुग्णघाटी परिसर ३, जवाहर कॉलनी १, पुंडलिकनगर २, इटखेडा ५, दशमेशनगर २, वेदांतनगर ५, स्टेशन रोड परिसर ६, एमआयटी कॉलेज परिसर १, एसआरपीएफ कॅम्प परिसर १, बीड बायपास १०, छत्रपतीनगर १, महादेव मंदिर परिसर, व्हिनस सो. १, सातारा परिसर ३, उस्मानपुरा ५, शिवशंकर कॉलनी १, सिग्मा हॉस्पिटल परिसर २, नागेश्वरवाडी १, गारखेडा ६, तारा पान सेंटर परिसर १, गुलमंडी ४, भावसिंगपुरा ४, श्रीनिकेतन कॉलनी ३, अंगुरीबाग १, विद्यानगर १, खोकडपुरा १, शहानूरवाडी ५, बेगमपुरा २, रामनगर १, ठाकरेनगर २, एन दोन येथे ४, शहानूरमिया दर्गाह परिसर १, मायानगर ३, फोनेक्स परिसर १, कामगार चौक ३, जयभवानीनगर २, गुरू सहानीनगर १, विद्यानगर १, हर्सूल परिसर ३, रामा इंटरनॅशनल हॉटेल परिसर १, पडेगाव ३, देवप्रिया हॉटेल परिसर ३, मिडो हॉटेल परिसर १, सिडको १, एन-सात येथे ८, एसपी ऑफिस परिसर १, जाधववाडी ५, एन-बारा येथे १, एशियन फार्मसी १, हडको २, एकनाथनगर १, पिसादेवी रोड २, एन-नऊ येथे ९, चंद्रनगर सो. १, साफल्यनगर १, एन-अकरा १, ताज हॉटेल परिसर १, जयनगर २, हनुमाननगर २, गजानन कॉलनी २, आविष्कार कॉलनी १, शिवाजीनगर ४, पारिजातनगर ३, आकाशवाणी परिसर २, सिंधी कॉलनी २, सूतगिरणी चौक परिसर ३, खाराकुँवा २, प्रोफेसर कॉलनी १, आदर्श कॉलनी १, गणेशनगर १, उल्कानगरी २, आदिनाथनगर २, टिळकनगर ३, बन्सीलालनगर २, जय गजानननगर ३, काल्डा कॉर्नर १, खिवंसरा पार्क १, कोकणवाडी २, राजेशनगर १, जालाननगर १, भवानीनगर २, उत्तरानगरी २, नक्षत्रवाडी १, वैभव कॉलनी १, जानकीपुरी कॉलनी १, बालाजी टॉवर, बीड बायपास २, एमआयटी कॉलेज परिसर १, छावणी पटेल चौक १, मयूर पार्क २, पैठण गेट १, एन-पाच येथे ३, बायजीपुरा ३, मदर तेरेसा नर्सिंग कॉलेज परिसर १, एन-सहा येथे १, चिकलठाणा १, स्वप्न नगरी १, दिवाणदेवडी २, एन-आठ येथे ६, टीव्ही सेंटर पोलीस कॉलनी ३, विशालनगर ३, रोकडिया हनुमान कॉलनी १, क्रांती चौक २, सोनार गल्ली १, श्रेयनगर १, न्यू बालाजीनगर १, मिटमिटा २, कांचनवाडी १, पैठण रोड २, मनीषा कॉलनी १, फैजलपुरा १, देशमुखनगर १, देवळाई परिसर, म्हाडा कॉलनी ३, पदमपुरा १, एन-वन येथे ३, गादिया विहार ३, रामप्रभू कॉलनी २, संजयनगर १, वृंदावन कॉलनी १, नंदनवन कॉलनी २, पटवर्धन हॉस्पिटल १, कैलास हॉटेल १, गुरुकृपा सो. चाणक्यपुरी १, सेव्हन हिल्स परिसर १, छावणी, मिलिटरी हॉस्पिटल १, कॅनॉट परिसर १, पैठण रोड १, रामेश्वरनगर १, खडकेश्वर १, समर्थनगर ६, शिवशंकर कॉलनी ३, न्यू नंदनवन कॉलनी १ अन्य ७४.
ग्रामीण भागातील रुग्णवाळूज २, वडगाव को. ५, बजाजनगर ७, सिडको महानगर एक २, म्हाडा कॉलनी, तिसगाव ३, रांजणगाव १, पळसगाव १, दौलताबाद १, चित्तेगाव १, अन्य ५५.