बालासाहेब काळे, हिंगोलीजिल्ह्यात महात्मा गांधी तंटामुक्ती मोहीम सुरू असून ५६५ पैकी ५१९ ग्रामपंचायतींनी आतापर्यंत तंटामुक्तीच्या माध्यमातून यशस्वी काम करून पुरस्कार पटकावले. २०१४-१५ या वर्षात उर्वरित ४६ ग्रामपंचायतींसाठी तंटामुक्ती मोहीम राबविली जात असून जिल्ह्यांतर्गत समित्यांनी नुकतेच मूल्यमापन केले असून त्याचा अहवाल १५ जुलै रोजी सादर केला जाणार आहे. महाराष्ट्रात २००७ पासून महात्मा गांधी तंटामुक्ती मोहीम राबविण्यात येत आहे. पहिल्या वर्षी जनजागृतीअभावी या मोहिमेला फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. दरम्यान, प्रशासनाबरोबरच जिल्हा पोलिस दलाने नवनवीन उपक्रम हाती घेऊन लोकांना तंटामुक्तीचे महत्व पटवून दिले. त्यामुळे मागील पाच वर्षात प्रत्येकवर्षी तंटामुक्तीच्या यशाचा आलेख वाढत गेल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. जिल्ह्यातील ५६५ पैकी ५१९ गावे आतापर्यंत तंटामुक्त होऊन पुरस्कारप्राप्त ठरली असून जिल्ह्यातील ४६ गावे या पुरस्काराच्या प्रतीक्षेत आहेत. या गावांना तंटामुक्त करण्यासाठी समित्यांना विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. २०१४-१५ या वर्षात जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील ५१९ गावे तंटामुक्ती मोहिमेमध्ये पुरस्कारास पात्र ठरली. यंदा १३ ठाण्यांच्या हद्दीत ही मोहीम प्रभावीपणे राबविली जात आहे. सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे यंदा तंटामुक्ती मोहिमेच्या कार्यक्रमात थोडा बदल करण्यात आला. २०१४-१५ या वर्षातील तंटामुक्त गावांच्या मूल्यमापनासाठी जिल्ह्यातील पाच तालुक्यांसाठी तालुकानिहाय समित्यांचे गठन करण्यात आलेले आहे. या समित्यांनी त्यांना नेमून दिलेल्या तालुक्यातील ग्रामपंचायतीचे ५ जून ते ५ जुलै या कालावधीत मूल्यमापन केले. त्याचा अहवाल १५ जुलैपर्यंत गृह मंत्रालयासह पोलिस महासंचालकांना महासंचालकांकडे सादर केला जाणार आहे. औंढा तालुका मूल्यमापन समितीचे अध्यक्ष तहसीलदार श्याम मदनूरकर व पोलिस निरीक्षक लक्ष्मण केंदे्र यांनी हिंगोली ग्रामीण व बासंबा ठाणे हद्दीतील १० ग्रामपंचायतींचे तंटामुक्तीसाठी मूल्यमापन केले असून त्याचा अहवाल महात्मा गांधी तंटामुक्ती अभियानचे जिल्हा समन्वयक जमादार शेख निजाम यांच्याकडे सादर केला आहे. इतर समित्यांनीही नेमून दिलेल्या ग्रामपंचायतींचे मूल्यमापन केले असून त्याचा अहवाल पोलिस मुख्यालयाकडे पाठवला आहे. १६ जुलै ते १५ आॅगस्ट या कालावधीत बाह्यमूल्यमापन समितीकडून तंटामुक्त गावांची तपासणी होणार आहे. प्रतीक्षा घोषणेचीमहाराष्ट्रात २००७ पासून महात्मा गांधी तंटामुक्ती मोहिम राबविण्यात येत आहे. पहिल्या वर्षी जनजागृतीअभावी या मोहिमेला फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता.मागील पाच वर्षात प्रत्येकवर्षी तंटामुक्तीच्या यशाचा आलेख वाढत गेल्याचे चित्र दिसत आहे. प्रशासनाबरोबरच जिल्हा पोलिस दलाने नवनवीन उपक्रम हाती घेऊन गावागावात जाऊन लोकांना तंटामुक्तीचे महत्व पटवून दिले आहे. जिल्ह्यातील ५६५ पैकी ५१९ गावे आतापर्यंत तंटामुक्त होऊन पुरस्कारप्राप्त ठरली असून जिल्ह्यातील ४६ गावे या पुरस्काराच्या प्रतिक्षेत आहेत.या गावांना तंटामुक्त करण्यासाठी पोलीस यंत्रणेसह समित्यांना विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. २०१४-१५ या वर्षात जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील ५१९ गावे तंटामुक्ती मोहिमेमध्ये पुरस्कारास पात्र ठरली. यंदा १३ ठाण्यांच्या हद्दीत ही मोहीम प्रभावीपणे राबविली जात आहे.सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे यंदा तंटामुक्ती मोहिमेच्या कार्यक्रमात बदल झाला आहे.
४६ ग्रामपंचायती; मूल्यमापन पूर्ण
By admin | Published: July 15, 2014 12:12 AM