लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: जिल्ह्यातील ४६ महसूल मंडळातंर्गत शेतकºयांना पुनर्रचित हवामानावर आधारित पीकविमा योजनेचा लाभ मिळणार आहे़ त्यासाठी गावांची पिकानुसार निवड करण्यात आली आहे़पंतप्रधान पीकविमा योजनेतंर्गत राज्यात पुनर्रचित हवामानावर आधारित पीकविमा योजना कार्यान्वित केली आहे़ त्यामुळे जिल्ह्यातील १६ तालुक्यांतील ४६ मंडळांतील शेतकºयांच्या द्राक्ष, आंबा, मोसंबी या पिकांना सुरक्षाकवच मिळणार आहे़ नांदेड तालुक्यातील तरोड बुु़, तुप्पा, वसरणी, लिंबगाव, विष्णूपुरी, अर्धापूर तालुका- दाभड, मालेगाव, मुदखेड - मुगट, बारड, हदगाव- तामसा, मनाठा, आष्टी, लोहा - शेवडी बाजार, भोकर, देगलूर - मरखेल, हाणेगाव येथील शेतकºयांचे द्राक्षाचे पीक सुरक्षित राहणार आहे़ तसेच नांदेड तालुक्यातील लिंबगाव, विष्णूपुरी, मुदखेड- बारड व अर्धापूर तालुक्यातील मालेगाव या मंडळातील मोसंबीचे पीक व नांदेड तालुक्यातील तरोडा बु़, तुप्पा, वसरणी, लिंबगाव, विष्णूपुरी, अर्धापूर- अर्धापूर, दाभड, मालेगाव, मुदखेड- मुदखेड, मुगट, बारड, हदगाव- हदगाव, तामसा, मनाठा, आष्टी, लोहा- शेवडी बाजार, भोकर, देगलूर- मरखेल, हाणेगाव, किनवट - बोधडी या २१ मंडळांतील शेतकºयांच्या केळीला विम्याचे संरक्षण मिळणार आहे़ अर्धापूर तालुक्यातील मालेगाव, दाभड या दोन मंडळातील आंब्याचेही विमा काढता येणार आहे़
४६ मंडळांची पिकांनुसार विम्यासाठी झाली निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2017 12:25 AM