लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : पावसाळा सुरु होऊन दोन महिने उलटले, तरीही औरंगाबाद जिल्ह्यावर वरुणराजा धो-धो कोसळत नसल्याने बळीराजाची धकधक वाढली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात मोठा पाऊस झाला नसला तरी नाशिक जिल्ह्यातील मुसळधार पाऊस मात्र आपल्या जायकवाडी धरणाला तृप्त करीत आहे, एवढीच आपल्या जिल्ह्यासाठी समाधानाची बाब आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पावसाचा जायकवाडी धरणावर परिणाम होत नाही. नाशिक, नगर जिल्ह्यातील पावसावरच जायकवाडीचे भवितव्य अवलंबून आहे.पावसाळ्याच्या सुरुवातीला काही तालुक्यात पावसाने चांगली सुरुवात करुन शेतकºयांनी उत्साहाने पेरणी करुन टाकली. त्यानंतर मात्र पावसाने हात आखडता घेतला. केवळ रिमझिम पावसाचा खेळ जिल्ह्यात सुरु असल्याने शेतकºयांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. जिल्ह्यातील जायकवाडी वगळता एकाही जलसाठ्यात अपेक्षित वाढ झालेली नाही. जिल्ह्यात या पावसाळ्यात आतापर्यंत केवळ ३१.१६ टक्केच पाऊस झाला आहे. सिल्लोड तालुक्यात आतापर्यंत ४६.५४ टक्के, औरंगाबाद तालुका-३०.३४ टक्के, फुलंब्री-४२.१८, पैठण-१६.०६, सोयगाव-२२.९४, कन्नड-३६.२०, वैजापूर -४५.९२, गंगापूर-२४.५१, खुलताबाद -२१.७२ टक्के पाऊस झाल्याची नोंद आहे. सर्वात कमी पाऊस पैठण तालुक्यात झाला. त्यामुळे यंदाचा हंगाम गेल्यातजमा आहे.शेतकºयांनी पेरणीवर केलेला खर्च वाया गेला असून काही शेतकरी दुबार पेरणी करीत आहेत. एवढे करुनही पाऊस आला नाही तर बळीराजा पुन्हा आर्थिक संकटात सापडणार आहे. सध्या शेतकºयांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत.
पावसाची पाठ; जायकवाडीत भरमसाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 1:11 AM