शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
4
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
5
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
6
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
7
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
8
NTPC Green IPO Listing Today: एनटीपीसी ग्रीनचं निराशाजनक लिस्टिंग; मात्र नंतर स्टॉक सुस्साट, पहिल्याच दिवशी अपर सर्किट
9
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
10
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
11
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
12
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
13
Stock Market Highlights: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात, मिडकॅप इंडेक्समध्ये खरेदी; Adani Ports टॉप लूझर
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
15
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
16
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
17
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
18
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
19
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
20
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."

शहरातील ५, ग्रामीणच्या १० कोरोना रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 4:05 AM

औरंगाबाद : जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात ५७८ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आणि ५४६ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले, ...

औरंगाबाद : जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात ५७८ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आणि ५४६ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले, तर गेल्या २४ तासांत २१ रुग्णांचा मृत्यू झाला. यात औरंगाबाद शहरातील ५, ग्रामीण भागांतील १० आणि अन्य जिल्ह्यांतील ६ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात सध्या ६ हजार ३४३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या १ लाख ३८ हजार ६१३ एवढी झाली आहे. तर आतापर्यंत एक लाख २९ हजार २८९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत २,९८१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ५७८ नव्या रुग्णांत शहरातील २१४ तर ग्रामीण भागामधील ३६४ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ११२ आणि ग्रामीण भागातील ४३४ अशा ५४६ रुग्णांना सुटी देण्यात आली.

उपचार सुरू असताना पाल, फुलंब्रीतील ६० वर्षीय महिला, वैजापूर येथील ६० वर्षीय पुरुष, पारगाव, पैठण येथील ६८ वर्षीय पुरुष, सिल्लोड येथील ५५ वर्षीय महिला, गोंडगाव, सोयगाव येथील ६६ वर्षीय पुरुष, बजाजनगर, वाळूज येथील ४८ वर्षीय महिला, लिंबगाव, पैठण येथील २७ वर्षीय पुरुष, जैतापूर, कन्नड येतील ७५ वर्षीय महिला, लाडगाव, कुंभेफळ येथील ८५ वर्षीय महिला, पैठण येथील ८४ वर्षीय पुरुष, शिवाजीनगर येथील ८० वर्षीय पुरुष, आदित्यनगर, हर्सूल येथील ६३ वर्षीय महिला, जाधवमंडी येथील ७० वर्षीय पुरुष, एन-२ येथील ६१ वर्षीय पुरुष, एन-१२ येथील ७१ वर्षीय पुरुष आणि अहमदनगर जिल्ह्यातील ५५ वर्षीय पुरुष, ४५ वर्षीय महिला, ७५ वर्षीय महिला, ८६ वर्षीय महिला, डांबरी, पाटोदा येथील ५५ वर्षीय पुरुष, जालना जिल्ह्यातील ३५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्ण

घाटी परिसर १, सिडको १, देवळाई २, गारखेडा २, सातारा परिसर २, बीड बायपास रोड १, खडी रोड १, अलाल कॉलनी १, शहानुरमियाँ दर्गा १, अरिहंतनगर ३, गणेशनगर २, जय भवानीनगर ८, शिवाजीनगर ३, गजानन कॉलनी २, आकाशवाणी १, राजनगर १, पद्मपुरा १, नाथनगर १, हनुमाननगर १, न्यू हनुमाननगर १, संजयनगर ३, न्यू गणेशनगर १, पुंडलिकनगर १, खाराकुआँ १, सुधाकरनगर १, लक्ष्मी कॉलनी १,मयूर पार्क ३, जाधववाडी १, ऑडिटर सोसायटी १, भाग्यनगर १, उल्कानगरी १, भावसिंगपुरा १, रेणुकानगर १, हर्सूल जेल २, एम. आय. डी. सी चिकलठाणा १, वसंतनगर १, एन-४ येथे २, एन-७ येथे ५, एन-२ येथे २, एन-१० येथे १, एन-११ येथे ३, एन-५ येथे १, एन-६ येथे १, एन-१ येथे १, एन-८ येथे १, एन-१३ येथे १, एन-९ येथे १, अन्य १३८

ग्रामीण भागातील रुग्ण

हिंदुस्तान आवास, कांचनवाडी २, नक्षत्रवाडी १, रांजणगाव २, बजाजनगर ३, डोणगाव ता. कन्नड १, चिकलठाणा ३, देवराई रोड १, पडेगाव १, वडाखा १, परसोडा ता. वैजापूर १, चित्तेपिंपळगाव १, मार्केट यार्ड रोड ता. गंगापूर १, पिसादेवी १, मानकी पो. पालेदवी १, हर्सूल सावंगी ३, नायगाव १, एम.आय. डी. सी. वाळूज १, गोलवाडी २, पळशी तांडा १, मुलानी आडगाव ता. पैठण १, दादगाव १, झाल्टा पो. चिकलठाणा १, हरसिध्दीनगर, कमळापूर वाळूज रोड १, सारा वृंदावन सिडको गार्डन वडगाव कोल्हाटी १, रांजणगाव पोळ ता.गंगापूर १, बकवालनगर, नायगाव १, सिडको वाळूज हॉस्पिटल २, शिवनेरी कॉलनी, रांजणगाव १, माळीवाडा १, अन्य ३२५