शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
5
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
6
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
7
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
8
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
9
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
10
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
11
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
12
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
13
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
15
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
16
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
17
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
18
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

मद्यपींना प्रत्येकी ५, ढाबा मालकास ५० हजार रुपये दंड

By राम शिनगारे | Published: December 11, 2022 8:23 PM

प्रथमवर्ग न्यायलयाकडून दंड : राज्य उत्पादन शुल्क विभागाची छापेमारी

औरंगाबाद: राज्य उत्पादन शुल्कच्या 'क' विभागाने फुलंब्री- सिल्लोड रस्त्यावरील ढाब्यावर मारीत अवैध दारू विक्री करणाऱ्या ढाबामालकासह पाच मद्यपींना पकडले. या आरोपींच्या विरोधात फुलंब्री प्रथमवर्ग न्यायालयात दोषराेपपत्र सादर केले. तेव्हा न्यायालयाने मालकास ५० हजार तर मद्यपींना प्रत्येकी ५ हजार रुपयांचा दंड ठोठावल्याची माहिती अधीक्षक संतोष झगडे यांनी दिली.

फुलंब्री- सिल्लोड रस्त्यावरील हॉटेल साईराज ढाबा याठिकाणी दुय्यम निरीक्षक एस.एस. पाटील यांच्या पथकाने १५ नोव्हेंबर रोजी छापा मारला. हॉटेल मालक सुरेश रंगनाथ वाघ (रा महालकिन्होळा, ता. फुलंब्री) हा अवैध दारू विकताना पकडला. तर पाचजण दारू पिताना आढळले. या सर्वांच्या विरोधात गुन्हा नोंदविल्यानंतर ८ नोव्हेंबर रोजी फुलंब्री न्यायालयाने वाघ यास ५० हजार, मद्यपींना प्रत्येकी ५ हजार रुपये असा एकुण ७५ हजार रुपयांचा दंड ठोठावला.

दुसऱी कारवाई हॉटेल अंबिका (पिशोर, ता. कन्नड) याठिकाणी ६ डिसेंबर रोजी केली. हॉटेल मालक भानुदास गाेविंद मोकासे (रा. पिशोर) यास अवैध दारू विकताना, पाच ग्राहकांना दारू पिताना पकडले. या आरोपींच्या विराेधात कन्नड प्रथमवर्ग न्यायालयात ९ डिसेंबर रोजी आरोपपत्र सादर केले. न्यायालयाने मालक मोकासे यास २५ हजार, मद्यपींस प्रत्येकी हजार रुपयांचा दंड ठोठावला. ही कामगिरी निरीक्षक नारायण डहाके, दुय्यम निरीक्षक एस.एस.पाटील, एस.डी. घुले, जहवान मयूर जैस्वाल, किशोर ढाले, मोतीलाल बहुरे, श्रावण खरात यांच्या पथकाने केली.सहा दिवसात आरोपींना शिक्षा

राज्य उत्पादन शुल्कचे अपअधीक्षक प्रदीप पोटे यांच्या नेतृत्वातील पथकाने तिसगाव शिवारातील हॉटेल संदीप याठिकाणी २ डिसेंबर रोजी छापा मारला. मालक करण जालिंदर पाटील हा ग्राहकांना मद्यपींसाठी सेवा पुरविताना आढळला. त्याच्यासह इतर ७ मद्यापींच्या विरोधात गुन्हा नोंदवित ९ डिसेंबर रोजी न्यायालयात आरोपपत्र सादर केले. न्यायालयाने मालकास २५ हजार, मद्यपींना प्रत्येकी ५०० रुपये असा एकुण २८ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला. सहा दिवसात आरोपींना शिक्षा देण्यात आली. ही कामगिरी उपअधीक्षक प्रदीप पोटे, दुय्यम निरीक्षक जी.बी. इंगळे, बी.ए.दौड, जी.एस.पवार, बी.आर. वाघमोडे, एस.बी.रोट यांच्यासह जवानांनी केली.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद