शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

निमशहरी भागातील पाणीपुरवठ्यासाठी ५० कोटी

By admin | Published: June 11, 2014 12:41 AM

औरंगाबाद : नगरपालिका क्षेत्रालगतच्या भागांना पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्ह्यात जलस्वराज्य-२ कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे.

औरंगाबाद : नगरपालिका क्षेत्रालगतच्या भागांना पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्ह्यात जलस्वराज्य-२ कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. याअंतर्गत जिल्ह्यातील २७ गावांमध्ये पाणीपुरवठा योजना उभारल्या जाणार आहेत. त्यासाठी पन्नास कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. जिल्ह्यात पाच वर्षे हा कार्यक्रम राबविला जाणार आहे. निमशहरी भागाला पिण्याच्या शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी जिल्ह्यात जलस्वराज्य-२ हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. हा प्रकल्प पुढील पाच वर्षे राबविला जाणार आहे.या प्रकल्पासाठी जिल्ह्यास पन्नास कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तो टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिला जाणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत निमशहरी म्हणून घोषित केलेल्या गावांमध्ये मागणीनुसार पाणीपुरवठा योजना उभारल्या जाणार आहेत.जिल्ह्यात एकूण ४९ गावे ही निमशहरी म्हणून घोषित झालेली आहेत. त्यातील २२ गावे ही महानगरपालिका हद्दीलगतची आणि उर्वरित २७ गावे ही नगरपालिका हद्दीलगतची आहेत. निमशहरांची लोकसंख्या वाढत चालल्यामुळे पाणीटंचाई तीव्र होत आहे. पाण्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे.या ठिकाणी काही दिवसांत पाणीपुरवठा योजना उभारल्या जाणार आहेत. उर्वरित ९ गावांमध्येही ग्रामपंचायतींकडून अर्ज आल्यास ही योजना राबविली जाऊ शकते, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी यांनी सांगितले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी सांगितले की, निमशहरी गावांमध्ये पाणीपुरवठा योजना अस्तित्वात आल्यानंतर तिथे नळांना मीटर बसविले जाणारआहेत. शिवाय या पाणीपुरवठा योजनांमध्ये पाण्याचे आणि विजेचे आॅडिट करण्याची संकल्पनाही अमलात येणार आहे. योजना अस्तित्वात आल्यानंतर नियमितपणे वीज आणि पाण्याच्या वापराचे एमजीपीमार्फत आॅडिट केले जाईल. नगरपालिकेलगतच्या निमशहरी ग्रामपंचायतीसिल्लोड नगरपालिका : पिंप्री, डोंगरगाव, भवन, मोढा खुर्दकन्नड नगरपालिका : अंधानेर, हिवरखेडा गौ, ब्राह्मी, गराडाखुलताबाद नगरपालिका : सराई, शूलिभंजन, खिर्डी सालुखेडापैठण नगरपालिका : कावसान, दक्षिण, उ. जायकवाडी, तांदूळवाडी, पटेगाव, दादेगाव ज., दादेगाव जुने, सायगाव, वडवाळी, वाघाडी, पंतेवाडी, तेलवाडी, चनकवाडी, वैजापूर नगरपालिका : वैजापूर ग्रा. १, वैजापूर ग्रा. २गंगापूर नगरपालिका : सिद्धपूरवाड्या-वस्त्यांनाही पाणीपुरवठाजलस्वराज्य-२ योजनेअंतर्गत पाचशेच्या आत लोकसंख्या असलेल्या वाड्या-वस्त्यांमध्ये पाणीपुरवठा योजना उभारण्यात येणार आहेत. मागील पाच वर्षांपासून उन्हाळ्यात ज्या वाड्या-वस्त्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करावा लागला असेल अशा सर्व वाड्या- वस्त्या या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत.आतापर्यंत लहान वाड्या-वस्त्यांसाठी पाणीपुरवठा योजनांना मंजुरी दिली जात नव्हती; मात्र आता या नवीन योजनेमुळे त्यांचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत मिळणार आहे. या योजनेत केवळ नगरपालिका हद्दीलगतच्या निमशहरी गावांचाच समावेश आहे. जिल्ह्यात २७ गावांमध्ये पाणीपुरवठा योजना उभारल्या जाऊ शकणार आहेत; मात्र आतापर्यंत केवळ १८ गावांनीच यासाठी जिल्हा परिषदेकडे अर्ज सादर केलेआहेत.