लोकमत न्यूज नेटवर्कसिल्लोड : आॅक्टोबर ते फेब्रुवारी २०१७ -१८ मध्ये झालेल्या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीतील सिल्लोड तालुक्यातील चौदा ग्रामपंचायतींच्या ५१ पराभूत उमेदवारांना जिल्हाधिकाऱ्यांनी विहित कालावधीमध्ये निवडणूक खर्च सादर न केल्यामुळे आगामी ५ वर्षांसाठी अपात्र ठरवून निवडणूक लढविण्यास बंदी घातली आहे. यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.निवडणूक निकाल जाहीर झाल्यावर ३० दिवसांच्या आत निवडणूक विभागास निवडणूक खर्च सादर करणे बंधनकारक होते. निवडणुकीत पराभूत झाल्यावर काही उमेदवारांनी निवडणूक खर्च सादर केला नाही. त्यामुळे तालुक्यातील ५१ उमेदवारांना अपात्र ठरविण्यात आले आहे. पराभूत झाल्यावरही खर्च सादर न केलेल्या व भावी ग्रामपंचायत सदस्य, सरपंच बनण्याचे स्वप्न पाहणाºयांना अजून ५ वर्षे आराम करावा लागणार आहे.निवडून आलेल्या बहुतेक ग्रामपंचायत सदस्यांनी वेळेत खर्च सादर केला. ५१ जणांनी आता आपण पराभूत झालो, खर्च सादर केला नाही तरी चालेल, असे म्हणून कानाडोळा केला. हाच हलगर्जीपणा त्यांच्या अंगलट आला, असे सिल्लोडचे तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी सांगितले.अपात्र ठरलेले गावनिहाय पराभूत उमेदवारहट्टी/मोहाळ - भोटकर यादव माणिकराव, भोटकर साहेबराव निंबाजी, जरारे कुसुमबाई चंद्रभान, जरारे मनोहर चंद्रभान, जरारे संगीता संजय.चारनेर/ चारनेरवाडी - दगडघाटे दत्तू अंबादास, अंभोरे निर्मलाबाई सुखदेव, देशमुख शाहीन मुजीब, रूपाली रवींद्र अंभोरे, पटेल रऊफ उस्मान, अंभोरे रेखाबाई भरत, पारखे मीना काशिनाथ, कैलास वाल्मिक शिंदे, अंभोरे केशवराव माणिकराव, गोठवाल प्रभू विठ्ठलसिंग, चौतमल कविता संजय, जोहरे नर्मदाबाई आनंदा, मरमट राजूसिंग कोंडिराम, गोठवाल प्रभू विठ्ठल.निल्लोड - आहेर राजीव कौतिकराव.जांभई - शेख फरजानबी सत्तार, शिंदे गंगा रमेश, शिंदे मिनाबाई साहेबराव, शिंदे कौतिकराव तुकाराम, शिंदे गंगाबाई विठ्ठल.खुल्लोड/ वीरगाव - निकम सागर धोंडिबा.मोढा बु. -पिंगळकर विजय रामदास, महाकाळ सुरेखाबाई दिगंबर, महाकाळ दिगंबर रामचंद्र,साबळे अंकुश भिमराव.सारोळा - वराडे पिराजी पुंडलिक.रेलगाव -गायकवाड मैनाबाई कडूबा, गायकवाड सुभद्राबाई रामराव, चव्हाण शानूबाई रामलाल.पिंपळदरी - राऊत अनिल किसन, साबळे मिराबाई संतोष.मोढा खुर्द - नाकीरे बाजीराव नामदेव.जळकी बाजार - दांडगे लोहिता संदीप, दांडगे मंगलबाई गणेश, दांडगे रूख्माबाई रतन, तडवी यनाजी पाशू, वरपे मंगलाबाई सुपडा, दांडगे लोहिता संदीप,सावखेडा खुर्द/ सावखेडा बु. - सोन्ने सुमनबाई मारुती, सोनवणे भगवान कडूबा.कासोद/ धामणी - राकडे छायाबाई रावसाहेब, घोडके मंगलबाई प्रकाश.धोत्रा : खंडाळकर वैशाली ईश्वरसिंग, गायकवाड सुनीता राजेंद्र, साठे शोभाबाई भास्कर, जाधव पुष्पाबाई विनोद.
सिल्लोड तालुक्यातील ५१ उमेदवार ग्रा.पं. निवडणूक लढविण्यास अपात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2018 12:16 AM