औरंगाबाद : आरटीओ कार्यालयातर्फे गेल्या वर्षभरात तब्बल ७६ हजार ८३० लायसन्स वाहनचालकांना घरपोच पाठविण्यात आले आहेत. यात नव्या लायसन्सधारकांची संख्या तब्बल ५१ हजार असल्याची माहिती सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील माने यांनी दिली.
आरटीओ कार्यालयातर्फे दररोज १३० पर्मनंट लायसन्सचे वितरण केले जाते. २०१८ मध्ये ७६ हजार ८३० लायसन्स पोस्टाने पाठविण्यात आले. यात २ हजार लायसन्स अपूर्ण पत्त्याअभावी कार्यालयात परत आले. ७६ हजार लायसन्समध्ये नवीन लायसन्स काढणाºयांची संख्या ५१ हजारांच्या घरात होती, तर उर्वरित नूतनीकरण, गहाळ झाल्यानंतर पुन्हा काढलेल्या लायसन्सचा समावेश असल्याची माहिती आरटीओ कार्यालयातर्फे देण्यात आली.एसटी महामंडळातर्फे भरती प्रक्रिया राबविण्यात येते. त्यादृष्टीने तरुणवर्ग लायसन्स काढून घेतात. शिवाय वयाची अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर लायसन्स काढण्याकडे कल असतो.-स्वप्नील माने, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी