शिक्षण : १५ दिवसांत शंभर टक्के नोंदणीचा विश्वास
औरंगाबाद : गेल्या दहा दिवसांत नवीन परिभाषित अंशदान पेन्शन योजनेतील २,३२५ शिक्षकांपैकी १,२२४ शिक्षकांनी राष्ट्रीय पेन्शन योजनेत नोंदणी केली आहे. वैजापूर, खुलताबाद, पैठण या तालुक्यांत चांगला प्रतिसाद मिळाला असून, औरंगाबाद, फुलंब्री तालुक्यातील समाधानकारक तर कन्नड, सोयगांव तालुक्यांतील प्रगती चिंताजनक असल्याचे शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जयस्वाल यांनी म्हटले आहे.
सिल्लोड व गंगापूर तालुक्यातील एनपीएस नोंदणी समाधानकारक असून, नोंदणीला गती देण्याच्या सूचना शिक्षणाधिकारी जयस्वाल यांनी दिल्या आहेत. शिक्षक संघटनांचा आधी डीसीपीएसचा हिशेब करा, नंतर नोंदणी करू, असा पवित्रा घेतला होता. मात्र, व्हिडीओ काॅन्फरन्सिंगद्वारे समुपदेश केल्याने शिक्षकांच्या शंका, समाधान झाल्याने चांगला प्रतिसाद मिळाला असून, पुढील १५ दिवसांत १०० टक्के एनपीएस नोंदणीचे लक्ष असून, ते पूर्ण होईल, असा विश्वासही जयस्वाल यांनी व्यक्त केला.