औरंगाबाद -घाटी रुग्णालयायीत मंजूर बेडची संख्या ११७७ असून सध्या ११७३६ खाटांवर उपचार दिले जात आहे. भविष्यात २ हजार खाटांची आवश्यकता भासेल. तसचे सध्याची सर्जीकल इमारत जूनी झाली असल्याने तिथे विस्तारीकरणाला मर्यादा असल्याने स्वतंत्र एक हजार खाटांची सर्जीकल उभारण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी ५२० कोटींचा खर्च अपेक्षित असून त्यासाठी पाठपुरावा करण्याची गरज असल्याचे अधिष्ठाता डाॅ. वर्षा रोटे कागीनाळकर यांनी पालकमंत्री संदिपान भूमरे यांच्या समोर मांडले. नव्या सर्जीकल इमारतीसाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही मंत्री भूमरे यांनी दिली.
घाटी प्रशासनाने वैद्यकीय शिक्षण संशोधन संचालनालयाला (डीएमईआर) कडे वाढीव बेडसाठी आणि नव्या इमारतीच्या आवश्यकतेसंदर्भात पत्रव्यवहार केला आहे. त्यानुसार डीएमईआरकडून प्रस्ताव पाठवण्याच्या सुचना मिळाल्या आहेत. त्यानुसार पालकमंत्र्यांसमोर बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. घाटीत ११७७ बेडला प्रशासकीय मान्यत आहे. मात्र सततच्या वाढीव रुग्णामुळे घाटीत ५५९ अतिरिक्त असे १७३६ बेड आहेत. मात्र घाटीला औषधीपुरवठा आणि कर्मचारी हे मंजूर ११७७ खाटांप्रमाणे मिळतात. त्यातडी अडचणी आहेत. रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हे गृहीत धरून २ हजार खाटांच्या मान्यता आणि त्यानुसार पदांची आवश्यकता भासणार आहे.
अशी आहे पदांची आवश्यकतासध्या ११७७ खाटांसाठी ८८९ परिचारीकांची पदे मंजूर आहेत. त्यापैकी २१८ पदे रिक्त आहेत. सध्याच्या खाटांसाठी आणखी ६८६ पदे आवश्यक आहेत. तर तांत्रीक कर्मचाऱ्यांची आणखी २०० पदे तर मंजूर चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची ७४४ पैकी ४३३ कर्मचारी आहेत. ११५ कर्मचारी कंत्राटी आहे. तर सध्याच्या खाटांसाठी आणखी वाढीव ५०० पदांची गरज आहे. असे अधिष्ठाता डाॅ. वर्षा रोटे कागीनाळकर म्हणाल्या.