औरंगाबाद: डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीधर गटातील अधिसभा निवडणुकीत १० जागांसाठी एकुण ५३ उमेदवार रिंगणात असतील. दाखल ९० अर्जांपैकी ३७ उमेदवारांनी शुक्रवारी माघार घेतली. अशी माहिती निवडणुक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव डॉ.भगवान साखळे यांनी दिली.
विद्यापीठातील सहा गणाच्या निवडणूका कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनात होत आहे. पहिल्या टप्प्यात पदवीधर प्रवर्गातून निवडून येणाऱ्या १० जागांची निवडणूक २६ नोव्हेंबर रोजी होणार आहे. यामध्ये खुल्या गटातून ५ तर आरक्षित गटातून प्रत्येकी एक असे ५ उमेदवारांसाठी निवडणूक होणार आहे. वैध-अवैध उमेदवारांच्या यादीत खुल्या गटातून ४४, अनुसूचति जाती ५, अनुसचित जमाती ७, भटके विमुक्त जाती-जमाती १६, इतर मागास प्रवर्ग ९ आणि महिला प्रवर्गातून ५ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शुक्रवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत मुदत होती. या काळात ३७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.
राखीव गटातील उमेदवारअनुसूचित जाती प्रवर्गातून बनसोडे निवृत्ती विश्वनाथ, दुर्गे जगन रुपचंद, जोगदंड रोहित दिपक, कांबळे शिरीष मिलिंदराव, मगरे सुनिल यादवराव, तायडे राहुल भिमराव हे ७ उमेदवार आहेत. अनुसूचित जमाती प्रवर्गातून बर्डे भागवत रामप्रसाद, माळी शहाजी विश्वनाथ, मोहम्मद अजारुद्दीन मोहम्मद सलीम, निकम सुनिल पुंडलिकराव हे चार अर्ज, विभक्त जाती आणि भटक्या जमाती प्रवर्गातून आघाव विनोद संतोष, भांगे दत्तात्रय सुंदरराव, कांबळे रखमाजी भागुजी, फड चंद्रकांत शिवाजीराव, सलामपुरे पुनम केशव हे५ अर्ज तर इतर मागास वर्ग प्रवर्गातून जाधव संदीप दत्तात्रय, राऊत सुभाष किसनराव, थोरात संतोष कारभारी, वाघ गणेश लक्ष्मण असे चार अर्ज आहेत. महिला प्रवर्गातून गायकवाड नंदा लक्ष्मणराव, काळे हर्षेमाला नरेंद्र, पाटील पुनम कैलास, तुपे ज्योती आसाराम असे पाच जण रिंगणात असणार आहे.
खुल्या प्रवर्गातून २९ उमेदवार रिंगणातखुल्या प्रवर्गातून बनसोडे पंकज बळीराम, भोसले संभाजी शिवाजीराव, भुतेकर रमेश खुशालराव, चव्हाण चंद्रकांत सोपानराव, धूपे सतिष असाराम, फंदे नितीन सत्यप्रेम, गवते सुनिल अकुंशराव, गवई विकास दत्तू, गुट्टे हनुमंत रघुनाथ, होके पाटील योगिता अशोकराव, इंगळे सुचिता चोखाजी, जाधव सुनिल नामदेव, कदम अमर अंबादासराव, काळे नरेंद्र हिरालाल, काळे सुनिल एकनाथराव, खैरनार भारत रामदास, नावंदर आशिष गोविंदप्रसाद, नवले लक्ष्मण उत्तमराव, निकम भागवत कुर्मादास, पवार विजय दादासाहेब, सलामपुरे पूनम केशव, सराफ तुकाराम शरदराव, सरकटे विलास कैलास, शेख जहूर खालेद, शिंगटे अमोल सर्जेराव, सोमवंशी हरिदास भगवानराव, तडवी अनिस शरीफ, तुपे पंडीत महीपती, वाघमारे परमेश्वर कचरु हे उमेदवार रिंगणात असतील.