लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : आर्थिक स्थिती खालावल्यानेच महावितरणने टोकाचे पाऊल उचलल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. तर अजून शेतीमालही विकला नाही तर महावितरणने थेट वीज तोडल्याने शेतकरी संतापला आहे. जिल्ह्यात महावितरणचे शेतीपंपाकडे तब्बल ५३0 कोटी रुपये थकले आहेत.हिंगोली जिल्ह्यात एकूण ७0 हजार ९0३ शेतकºयांनी कृषीपंपासाठी वीज जोडणी घेतली आहे. यात हिंगोलीत १२ हजार १७२ शेतकºयांकडे ७३.७२ कोटी, वसमत तालुक्यात २0 हजार ८२२ शेतकºयांकडे १६५.२९ कोटी, कळमनुरी तालुक्यात १३ हजार ४७ शेतकºयांकडे ९४.१९ कोटी, औंढा तालुक्यात ११ हजार ४९४ शेतकºयांकडे १0१.३१ कोटी रुपये तर सेनगाव तालुक्यातील १३ हजार ३६८ शेतकºयांकडे ९५.६४ कोटी रुपये थकले आहेत. सर्वाधिक वीज जोडण्या व थकबाकीही वसमत तालुक्यात आहे. त्यामुळे या तालुक्यातून मोठा उदे्रक होत आहे. मागील सहा महिन्यांच्या काळात ४५ शेतकºयांनी केवळ १३ लाख ४0 हजार रुपयांची थकबाकी भरलेली आहे. सध्या वीज कंपनीने सुरू केलेल्या कारवाईत ५४ हजार ५५८ शेतकºयांच्या वीजजोडण्या तोडल्या आहेत. यात हिंगोली १२१७२, वसमत-२0८२२, कळमनुरी- १३0३२, औंढा-३१७९, सेनगाव १३५३ अशी तालुकानिहाय वीज जोडण्या तोडलेल्यांची संख्या आहे. तर औंढ्यात ४२00 व सेनगावातील १२0१0 शेतकºयांच्या वीज जोडण्या तोडणे बाकी आहे. त्यामुळे एकूणच वातावरण संतप्त होत आहे.
महावितरणचे ५३0 कोटी थकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 12:41 AM