शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
2
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
9
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
10
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
11
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
12
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
13
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
14
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
15
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
16
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
17
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
18
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
19
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
20
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये

सरपंचपदासाठी ५५२ तर सदस्यांसाठी २६५१ अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 1:11 AM

जिल्ह्यातील १२६ ग्रामपंचायतीमधील सरपंचपदासाठी ५५२ अर्ज आले असून सदस्यपदासाठी २६५१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. या अर्जांची २५ सप्टेंबरपासून छाननी करण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील १२६ ग्रामपंचायतीमधील सरपंचपदासाठी ५५२ अर्ज आले असून सदस्यपदासाठी २६५१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. या अर्जांची २५ सप्टेंबरपासून छाननी करण्यात येणार आहे.नोव्हेंबर व डिसेंबर २०१७ मध्ये मुदत संपणाºया जिल्ह्यातील १२६ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सद्यस्थितीत सुरु आहे. १५ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून २२ सप्टेंबर हा अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे जिल्ह्यातील नऊही तालुक्यांतील तहसील कार्यालय परिसरात इच्छुकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. आता आलेल्या अर्जांची २५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजेपासून छाननी होणार आहे. त्यानंतर २७ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत संबंधितांना नामनिर्देशनपत्र परत घेता येणार आहे. याच दिवशी दुपारी ३ वाजेनंतर अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध होणार असून त्यांना लागलीच चिन्हांचे वाटप होणार आहे. ७ आॅक्टोबर रोजी मतदान होणार असून ९ आॅक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.दरम्यान, शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने सोनपेठ तहसील कार्यालयात बरीच गर्दी दिसून आली. तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींच्या सदस्यपदासाठी ७१ तर सरपंचपदासाठी १३ उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यामध्ये आवलगाव येथे सदस्यपदासाठी ३३ तर सरपंचपदासाठी ६, वाणीसंगम येथे सदस्यपदासाठी २३ तर सरपंचपदासाठी ४, दुधगाव येथे सदस्यपदासाठी १५ तर सरपंचपदासाठी तीन अर्ज दाखल झाले.मानवत तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदासाठी ३३ तर सदस्यपदासाठी १५७ अर्ज दाखल झाले. त्यामध्ये देवलगाव आवचार ग्रा.पं.मध्ये सदस्यपदासाठी २२ तर सरपंचपदासाठी ४, कोल्हावाडी ग्रापंमध्ये सदस्यपदासाठी १९ तर सरपंचपदासाठी ३, वझूर बु. येथे सदस्यपदासाठी १६ तर सरपंचपदासाठी २, रत्नापूर येथे सदस्यपदासाठी १५, सरपंचपदासाठी ७, आंबेगाव येथे सदस्यपदासाठी ३५ तर सरपंचपदासाठी ६, सोनुळा येथे सदस्यपदासाठी १४ तर सरपंचपदासाठी ४, इरळद येथे सदस्यपदासाठी १८, सरपंचपदासाठी ४, मानोली येथे सदस्यपदासाठी १८ तर सरपंचपदासाठी ३ अर्ज दाखल झाले.सेलू तालुक्यातील ११ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असून या तालुक्यात सदस्यपदासाठी एकूण २४१ तर सरपंचपदासाठी ५० अर्ज दाखल झाले. त्यामध्ये गुगळीधामणगाव येथे सरपंचपदासाठी ४, सदस्यपदासाठी २३, कुपटा येथे सरपंचपदासाठी ५, सदस्यपदासाठी २६, रवळगाव येथे सरपंचपदासाठी ६, सदस्यपदासाठी २८, म्हाळसापूर येथे सरपंचपदासाठी ५, सदस्यपदासाठी १३, डिग्रस जहांगीर येथे सरपंचपदासाठी ५ तर सदस्यपदासाठी २८, राव्हा येथे सरपंचपदासाठी ४ तर सदस्यपदासाठी १५, राधेधामणगाव येथे सरपंचपदासाठी ३ तर सदस्यपदासाठी १४, बोरकिनी/ नरसापूर येथे सरपंचपदासाठी २ तर सदस्यपदासाठी १९, शिंदे टाकळी येथे सरपंचपदासाठी ५ तर सदस्यांसाठी २२, डासाळा येथे सरपंचपदासाठी ५ तर सदस्यांसाठी ३४, मालेटाकळी येथे सरपंचपदासाठी ६ तर सदस्यपदासाठी १९ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले.गंगाखेड तालुक्यातील १३ ग्रा.पं.मध्ये निवडणूक होत असून या ग्रा.पं.मध्ये सरपंचपदासाठी ३९ तर सदस्यपदासाठी १६० अर्ज शेवटच्या दिवशी दाखल झाले. त्यामध्ये महातपुरी येथे सरपंचपदासाठी ५, सदस्यपदासाठी २७, शंकरवाडी येथे सरपंचपदासाठी २, सदस्यपदासाठी १६, भांबरवाडी येथे सरपंचपदासाठी ३, सदस्यपदासाठी १६, बेलवाडी येथे सरपंचपदासाठी १ तर सदस्यपदासाठी १४ अर्ज आले. येथे सरपंचपदासाठी एकच अर्ज आल्याने येथील सरपंचपद बिनविरोध निवडल्या गेले आहे. घटांग्रा येथे सरपंचपदासाठी ५ तर सदस्यपदासाठी १४, नागठाणा येथे सरपंचपदासाठी १ अर्ज दाखल झाल्याने येथील पद बिनविरोध निवडल्या गेले आहे. सदस्यपदासाठी ७ अर्ज आले आहेत. झोला पिंपरी येथे सदस्यपदसाठी २६ तर सरपंचपदासाठी ६ अर्ज दाखल झाले. डोंगरजवळा येथे सरपंचपदासाठी ९ तर सदस्यपदासाठी १४, सिरसम येथे सरपंचपदासाठी २, सदस्यपदासाठी ८, रुमना जवळा येथे सरपंचपदासाठी ९ तर सदस्यपदासाठी २५, चिलगरवाडी येथे सरपंचपदासाठी ६, सदस्यपदासाठी २१, इळेगाव येथे सरपंचपदासाठी ४, सदस्यपदासाठी २४, मसनेरवाडी येथे सरपंचपदासाठी ३ तर सदस्यपदासाठी १८ अर्ज दाखल झाले.पाथरी तालुक्यातील ७ ग्रा.पं.साठी निवडणूक होत असून येथे सरपंचपदासाठी २६ तर सदस्यपदासाठी १६२ अर्ज दाखल झाले. त्यामध्ये खेडूळा ग्रा.पं.च्या सरपंचदासाठी ७, सदस्यपदासाठी २५, मुद्गल सरपंचपदासाठी ३, सदस्यपदासाठी २१, वडी सरपंचपदासाठी ८, सदस्यपदासाठी ३६, गोपेगाव सरपंचपदासाठी ५, सदस्यपदासाठी १५, लोणी बु. सरपंचपदासाठी ५, सदस्यपदासाठी २७, ढालेगाव सरपंचपदासाठी ६, सदस्यपदासाठी १५, जवळा झूटा सरपंचपदासाठी ३ व सदस्यपदासाठी २३ अर्ज अखेरच्या दिवशी दाखल झाले. आता दाखल झालेल्या अर्जांपैकी किती जण माघार घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.