लोकमत न्यूज नेटवर्कसिल्लोड : सिल्लोड येथे रविवारी मुस्लिम समाजाच्या सामूहिक सोहळ्यात तब्बल ५५५ विवाह लागले. आ. अब्दुल सत्तार यांच्या कन्येचा विवाहही या सोहळ्यात झाला.शहरातील नॅशनल उर्दू शाळेच्या प्रांगणात झालेल्या या सोहळ्यातील नवदाम्पत्यांना आशीर्वाद देण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, लोकमतचे एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा, पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, खा. चंद्रकांत खैरे, आ. सुभाष झांबड, आ. सतीश चव्हाण, आ. राजेश टोपे, आ. विक्रम काळे, आ. इम्तियाज जलील, आ. भाऊसाहेब चिकटगावकर, औरंगाबादचे महापौर नंदकुमार घोडेले, पंकज फुलपगर, शेख युसूफ, जेष्ठ नेते केशवराव औताडे, प्रभाकरराव पालोदकर, काँग्रेस सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, माजी आमदार सुरेश जेथलिया, नितीन पाटील, डॉ. कल्याण काळे, कैलास गोरंट्याल, नामदेव पवार, सांडू पाटील लोखंडे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुरेश पाटील, जि.प. अध्यक्षा देवयानी डोणगावकर, जि.प. उपाध्यक्ष केशवराव तायडे, मौलाना गुलाम मोहंमद वस्तावनी, मौलाना मुसा, हाफीज इलियास रियाजी, मौलाना रफीक दानापुरी, बालयोगी काशीगीरी महाराज, मंगळूरकर महाराज आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.या सोहळ्यात सहभागी होणाऱ्या नवीन दाम्पत्यास संसारोपयोगी साहित्य तसेच येणाºया पाहुण्यांसाठी जेवण, पाणी आदी आदरतिथ्य आयोजकांच्या वतीने करण्यात आले होते. गेल्या काळात हजारो मुस्लिम तरुणांनी या सोहळ्यात आपला निकाह केल्याने त्यांची आर्थिक बचत झाली. लग्नासाठी होणारा खर्च त्यांना त्यांच्या वैवाहिक जीवनात कामी आला. यावर्षी ५५५ जणांचा निकाह या इज्तेमाई शादियामध्ये पार पडला.या सोहळ्यास तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष देवीदास लोखंडे, बाजार समितीचे सभापती रामदास पालोदकर, उपसभापती नंदकिशोर सहारे, उपनगराध्यक्ष शकुंतलाबाई बन्सोड, जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुरेखा पानकडे, उपाध्यक्ष दुर्गाबाई पवार, तालुकाध्यक्ष सीमा गव्हाणे, सोयगाव तालुकाध्यक्ष प्रभाकर काळे, माजी पंचायत सभापती अशोक गरुड, सुनील मिरकर, बुलडाणा पंचायत समितीचे सभापती निसार चौधरी आदींसह राजकीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, प्रशासकीय सेवेतील अधिकारी, कर्मचारी, नगरसेवक यांच्यासह हजारो नागरिकांची यावेळी उपस्थिती होती.‘सामूहिक विवाह सोहळा काळाची गरज’सामूहिक विवाह सोहळा ही काळाची गरज असून आ. अब्दुल सत्तार यांचा हा उपक्रम प्रेरणादायी आहे. आ. अब्दुल सत्तार यांनी आपल्या मुलांचा विवाह या सोहळ्यात केल्याने त्यांनी समाजासमोर आदर्श निर्माण केला, अशा शब्दात उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाची प्रशंसा करून नवदाम्पत्यांना शुभेच्छा दिल्या.गेल्या १४ वर्षांपासून सिल्लोड येथे आ. अब्दुल सत्तार यांच्या संकल्पनेतून व नॅशनल एज्युकेशन सोसायटीच्या वतीने या मुस्लिम सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. आ. अब्दुल सत्तार यांनी आपले चिरंजीव सिल्लोडचे नगराध्यक्ष अब्दुल समीर यांचा विवाहही याच सोहळ्यात दोन वर्षांपूर्वी लावला होता.
सिल्लोड येथे सामूहिक सोहळ्यात ५५५ विवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 12:45 AM