लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्हा परिषद शिक्षकांच्या सार्वत्रिक बदलीनंतर तब्बल ५८ शिक्षक शाळांवर रुजूच झाले नाहीत. यासंदर्भात अनेक शाळा गुरुजींच्या प्रतीक्षेत आहेत. दुसरीकडे, अशा गुरुजींविरुद्ध कारवाई करण्यासाठी प्रशासनासमोरही पेच निर्माण झाला आहे.नवीन बदली धोरणानुसार २९ मे रोजी तब्बल साडेतीन हजार जि. प. शिक्षकांच्या बदलीचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांच्या मेलवर आले. पवनीत कौर कार्यालयीन कामानिमित्त बाहेरगावी असल्यामुळे रात्री उशिरापर्यंत शिक्षणाधिकारी एस. पी. जैस्वाल व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी बदलीचे आदेश हस्तगत केले. दुसºया दिवशी पवनीत कौर यांच्या स्वाक्षरीने तालुकानिहाय बदल्यांचे आदेश गटशिक्षणाधिकाºयांकडे सुपूर्द केले. तथापि, पहिल्या टप्प्यात ५२७ शिक्षक विस्थापित झाले होते. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा शाळांचा पसंतीक्रम नोंदविण्यासाठी संवर्ग-५ द्वारे आॅनलाईन नोंदणीची संधी देण्यात आली. त्यानंतर दुसºया टप्प्यात ३६३ शिक्षकांना पदस्थापना देण्यात आल्या. उर्वरित १६४ पैकी १५९ शिक्षकांच्या बदलीचे आदेश १६ जून रोजी राज्यस्तरीय बदली कक्षाकडून प्राप्त झाले.राज्यस्तरीय बदली कक्षाकडून देण्यात आलेले तिसºया टप्प्यातील बदलींचे आदेश शिक्षकांच्या पसंतीनुसार नव्हे, तर शाळांच्या गरजेनुसार देण्यात आले. दोन आठवड्यापूर्वी या कक्षाने जिल्ह्यातील शाळांवरील शिक्षकांच्या रिक्त जागांचा अहवाल शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून मागविण्यात आला होता. त्यानुसार विस्थापित शिक्षकांना शाळांच्या गरजेनुसार पदस्थापना देण्यात आल्या.दरम्यान, यंदा पहिल्यांदाच राज्यस्तरीय कक्षाकडून बदली प्रक्रिया राबविण्यात आली असून, कोणत्या प्रशासकीय आणि कोणत्या विनंती बदल्या समजायच्या असा गोंधळ प्रशासनासह शिक्षकांमध्येही निर्माण झाला आहे. तथापि, बदली आदेश निर्गमित केल्यानंतर लगेच दुसºया दिवशी शिक्षकांना कार्यमुक्त करावे व शिक्षकांनी तात्काळ बदलीच्या ठिकाणी रुजू होण्याचे आदेश ग्रामविकास विभागाचे आहेत. मात्र, असे असले तरी प्रशासकीय बदली झालेल्या शिक्षकाला नवीन ठिकाणी रुजू होण्यासाठी ७ दिवसांची मुदत असते, तर विनंती बदली झालेल्या शिक्षकांनी मात्र, लगेच शाळेवर रुजू व्हावे, असा नियम आहे.आज शाळांवर रुजू होण्याची अपेक्षायासंदर्भात शिक्षणाधिकारी एस. पी. जैस्वाल यांनी सांगितले की, प्रामुख्याने विस्थापित शिक्षकांपैकी ज्यांना पसंतीक्रमानुसार शाळा भेटल्या नाहीत. शाळांच्या गरजेनुसार राज्यस्तरीय कक्षाने थेट शिक्षकांच्या पदस्थापना शाळांवरच केल्या, अशा शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या समजल्या जातील. पसंतीक्रमानुसार मिळालेल्या शाळा या विनंती बदल्या समजल्या जातील. बदली झाल्यानंतर विहित कालावधीत रुजू न होणाºया शिक्षकांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचे ग्रामविकास विभागाचे निर्देश आहेत. अद्यापही ५८ शिक्षक बदली झाल्यानंतरही रुजू झालेले नाहीत. उद्या सोमवारपर्यंत ते शाळेवर रुजू होतील, अशी अपेक्षा आहे.
औरंगाबाद जिल्हा परिषदेचे ५८ शिक्षक बदलीनंतर ‘गायब’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 12:09 AM
जिल्हा परिषद शिक्षकांच्या सार्वत्रिक बदलीनंतर तब्बल ५८ शिक्षक शाळांवर रुजूच झाले नाहीत. यासंदर्भात अनेक शाळा गुरुजींच्या प्रतीक्षेत आहेत. दुसरीकडे, अशा गुरुजींविरुद्ध कारवाई करण्यासाठी प्रशासनासमोरही पेच निर्माण झाला आहे.
ठळक मुद्देशाळांना प्रतीक्षा : कारवाईचे निकषही वेगळे; प्रशासनासमोर पेच, अनेक शाळांना हवेत गुरु जी