----------------------------------------------
पहिल्यांदा केले रक्तदान
सीआयएसएफचे उपनिरीक्षक सुनीता सुरा यांनी सांगितले की, रक्तदान करण्याची मला मनातून खूप इच्छा होती. आज लोकमतच्या माध्यमातून रक्तदान करण्याची इच्छा पूर्ण झाली. आयुष्यात पहिल्यांदा मी रक्तदान केले. खूप आनंद वाटला. आपले रक्त कोणाला जीवदान देऊ शकते, ही भावनाच भारावून सोडणारी आहे.
-------
रक्ताचा प्रत्येक थेंब देशासाठी कामी यावा
सीआयएसएफमधील राजेश कुमार यांनी सांगितले की, मी मूळचा राजस्थानचा आहे. लोकमतने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात मी आयुष्यात पहिल्यांदा रक्तदान केले. आम्ही आमचे आयुष्य देशसेवेसाठी वाहून घेतले आहे. यामुळे आमच्या शरीरातील रक्ताचा प्रत्येक थेंब देशासाठी कामी यावा, हीच आमची भावना आहे.
-------
दर तीन महिन्यांनी शिबिर घ्यावे
सीआयएसएफचे जवान आर.के. प्रीतम यांनी सांगितले की, आजही रक्तदानाविषयी जनजागृतीचा अभाव आहे. रक्तदानाविषयी अनेक गैरसमज आहेत. देशवासीयांनी सर्व गैरसमज बाजूला ठेवून स्वत:हून रक्तदानासाठी समोर आले पाहिजे. लोकमतने दर तीन महिन्यांनी असे शिबिर घ्यावे. आम्हीही त्यात रक्तदान करून आमचे योगदान देऊ. आजपर्यंत विविध ठिकाणी १५ वेळा रक्तदान केल्याचे त्यांनी सांगितले.