औरंगाबाद, दि.३१ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उद्यान अधीक्षक डॉ.गोविंद हुंबे, सहायक कुलसचिव शोभा किसवे, तसेच वरिष्ठ सहायक जीवन डोंगरे, कैलास देशमुख, एस.आर. जमदाडे, रंजना जगदाळे आदी सहा अधिकारी, कर्मचाऱ्यांरी सोमवारी निवृत्त झाले असून, त्यांना प्रशासनाच्या वतीने समारंभपूर्व निरोप देण्यात आला.
यावेळी प्रकुलगुरू डॉ.श्याम शिरसाठ म्हणाले, नियत वयोमानानुसार जरी आपण सेवानिवृत्ती होत असलो, तरी व्यक्तिगत स्तरावर आपण कार्यरत असतो. यानंतरचे आयुष्य ही नव्या जीवनाची सुरुवात असते. परिवर्तन हा निसर्गाचा नियम असून, काळाबरोबरच स्वत:च्या जीवनशैलीत बदल घडवून आणणारेच चिरकाल टिकत असतात.
यावेळी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ.राजेश करपे, कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष डॉ.कैलास पाथ्रीकर, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष पर्वत कासुरे, तसेच सेवानिवृत्तांपैकी डॉ.गोविंद हुंबे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकुलगुरू डॉ.श्याम शिरसाठ होते. कुलसचिव डॉ.जयश्री सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. संजय शिंदे यांनी सूत्रसंचालन केले, तर अनिल खामगावकर यांनी आभार मानले.
यावेळी अधिष्ठाता डॉ.वाल्मिक सरवदे, डॉ.फुलचंद सलामपुरे, डॉ.भालचंद्र वायकर, परीक्षा मंडळाचे संचालक डॉ.योगेश पाटील, कार्यकारी अभियंता रवींद्र काळे आदींची उपस्थिती होती.