शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत राडा! ठाकरे-शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, मध्यरात्री वातावरण तापलं!
2
सौदीचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान इस्रायलवर संतापले; म्हणाले, "गाझावरील हल्ला हा..."
3
एलॉन मस्क आणि भारतीय वंशाच्या विवेक रामास्वामींवर ट्रम्प यांनी सोपवली मोठी जबाबदारी, सरकारमध्ये केला समावेश
4
Stock Market Highlights: शेअर बाजारात आजही घसरण; Nifty २३,९०० च्या खाली, सर्व क्षेत्रीय निर्देशांक रेड झोनमध्ये
5
'तुमची ताकद किती समजून जाईल'; गणेश नाईकांसमोरच फडणवीसांचं संदीप नाईकांना सूचक इशारा
6
माझ्याकडे महाराष्ट्राचे सत्यात उतरणारे स्वप्न, माझा कम्फर्ट भाजपसोबत; राज ठाकरेंनी मांडली रोखठोक भूमिका
7
आजचे राशीभविष्य - १३ नोव्हेंबर २०२४, लाभदायी दिवस, नोकरीत यश मिळेल, घरातील वातावरण सुखद राहील
8
NTPC Green IPO च्या प्राईज बँड आणि तारखेची माहिती आली समोर, पाहा संपूर्ण डिटेल्स
9
'यारिया' फेम सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता चढला बोहल्यावर, दिल्लीतील मंदिरात केलं थाटामाटात लग्न
10
Maharashtra Election 2024 Live Updates: राज ठाकरे यांची आज वरळीत दुसरी जाहीर सभा, कोणावर साधणार निशाणा?
11
मुक्ता बर्वे कलर्स मराठीवरील 'या' मालिकेत साकारणार आगळीवेगळी भूमिका; प्रोमो बघाच
12
LIC नं Tata Group मधील 'या' कंपनीतील हिस्सा विकला, शेअर जोरदार आपटला
13
झारखंडमध्ये आज मतदान,  १० राज्यांत होणार पोटनिवडणूक
14
सलमान खानला पाठवले धमकीचे मेसेज! पोलिसांनी युवा गीतकाराला ठोकल्या बेड्या; समोर आलं मोठं कारण
15
मराठा समाजाची कांड्यांवर मोजण्याइतकी आहेत मतं; भाजपच्या बबनराव लोणीकरांचे वादग्रस्त वक्तव्य
16
आजचा अग्रलेख: भुजबळ ‘सीएम’ का झाले नाहीत?
17
शिवाजी पार्कवर उद्धवसेना, मनसेची सभा होणार?; नगरविकास खात्याच्या निर्णयाकडे लक्ष
18
जगातले दुश्मन एकत्र येतात तर आम्ही एकत्र येण्यावर चर्चा तर हवी; 'लोकमत'च्या मुलाखतीत राज ठाकरेंचं वक्तव्य
19
२० वर्षांत मतदार नेमके कुणाकडे गेले? २००४ ते २०१९ मध्ये काय घडलं?; जाणून घ्या आकडेवारी
20
२ हजारांहून अधिक मतदार सध्या कामानिमित्त परदेशात

रिलायन्स स्मार्ट पॉइंटमधील कर्मचाऱ्यांनीच ६ लाखांचा किराणा माल गायब केला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 7:26 PM

चोरी सीसीटीव्ही कैद झाली असून ६ कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

 

वाळूज महानगर : बजाजनगर-वडगाव परिसरातील रिलायन्स स्मार्ट पाॅइंट या किराणा शॉपीत काम करणाऱ्या ६ कर्मचाऱ्यांनी शॉपीतील ६ लाखांचा किराणा माल गायब केला आहे. या फसवणूक प्रकरणी ६ कर्मचाऱ्यांविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रिलायन्स रिटेल प्रा.लि. मुंबईचे बजाजनगरातील प्लॉट क्रमांक ४२ मध्ये रिलायन्स स्मार्ट पाॅइंट आहे. दर तीन महिन्यांनी कंपनीतर्फे स्मार्ट पाॅइंटमधील सामानांची तपासणी व ऑडिट केले जाते. ५ ऑगस्टला कंपनीच्या जावेद शेख, संदीप गाडेकर व जया देशमुख या मार्केटिंग अधिकाऱ्यांना विक्री झालेला किराणा माल व शिल्लक राहिलेल्या मालामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळली. या तफावतीनंतर या शॉपीतील व्यवस्थापक अमोल फुके व इतर कर्मचाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली. मात्र, येथील एक कामगार ऋषीकेश जवंजाळ यांच्याकडे विचारणा केली असता त्याने या शॉपीमध्ये काम करणाऱ्या ५ कर्मचारी तसेच पूर्वी या शॉपीत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने किराणा माल पैसे न देता वाहनातून घेऊन गेल्याची माहिती दिली.

चोरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैददरम्यान, येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी करताना रात्री ८.३० ते ९.४५ वाजेच्या सुमारास या शॉपीमध्ये काम करणारे ६ कर्मचारी शॉपीतील किराणा सामान ट्रॉलीमध्ये भरुन तसेच काऊंटरवर बिलाचे पैसे जमा न करता घेऊन जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. शॉपीतील चोरी केलेला किराणा सामान चारचाकी वाहनातून या कर्मचाऱ्यांनी नेले होते. त्यांनी ६ लाख १९ हजार २४९ रुपयांचा किराणा माल लंपास केल्याचे कंपनीचे मार्केटिंग व्यवस्थापक जावेद शेख यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तक्रार दिली आहे. या तक्रारीवरुन अमोल आत्माराम फुके (रा.जटवाडा), पंकज खंडागळे (रा.नारळीबाग), संदीप धांडगे (रा. निसर्ग कॉलनी, भावसिंगपुरा), अल्तमश अब्दुल शेख (रा. इब्राहिम शहा कॉलनी), ऋषीकेश गजानन जवंजाळ (रा. माऊलीनगर, कमळापूर) व सय्यद रहेमान अफान (रा. बेगमपुरा) या ६ कर्मचाऱ्यांविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास उपनिरीक्षक काकड हे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद