शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

जायकवाडीत पोहोचेल ६ टीएमसी पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2018 10:55 PM

नगर, नाशिक जिल्ह्यांतील धरणांतून मराठवाड्याच्या हक्काचे पाणी तब्बल १५ दिवसांच्या संघर्षानंतर अखेर गुरुवारी जायकवाडी धरणाच्या दिशेने झेपावले. ‘जायकवाडी’साठी ८.९९ म्हणजे जवळपास ९ टीएमसी पाणी सोडण्यात येत आहे. प्रत्यक्षात कोरडे नदीपात्र, वाळू उपशाचे खड्डे आणि अन्य कारणांनी ६ टीएमसी पाणीच पोहोचण्याचा अंदाज आहे. तब्बल ३ टीएमसी पाण्याच्या नुकसानीची भीती आहे.

ठळक मुद्दे ३ टीएमसीचे नुकसान : कोरडे नदीपात्र, वाळू उपशाच्या खड्ड्यांमुळे पाण्यात घट होण्याचा अंदाज

औरंगाबाद : नगर, नाशिक जिल्ह्यांतील धरणांतून मराठवाड्याच्या हक्काचे पाणी तब्बल १५ दिवसांच्या संघर्षानंतर अखेर गुरुवारी जायकवाडी धरणाच्या दिशेने झेपावले. ‘जायकवाडी’साठी ८.९९ म्हणजे जवळपास ९ टीएमसी पाणी सोडण्यात येत आहे. प्रत्यक्षात कोरडे नदीपात्र, वाळू उपशाचे खड्डे आणि अन्य कारणांनी ६ टीएमसी पाणीच पोहोचण्याचा अंदाज आहे. तब्बल ३ टीएमसी पाण्याच्या नुकसानीची भीती आहे.निळवंडे धरणातून गुरुवारी सकाळी प्रारंभी ४,२५० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. पाण्याचा विसर्ग दुपारी वाढविला. येथून ७ हजार ५०५ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला, तर मुळा धरणातून ८ हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू होता. दारणा धरणातून ११ हजार १५८ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. गंगापूर धरणातून ३ हजार ५२४, तर मुकणे धरणातून १ हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. पालखेड धरण समूहातून जायकवाडीसाठी ०.६० टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे.आज दुपारपर्यंत येणार पाणीजायकवाडीत २४ ते २६ तासांत १४० कि.मी.चा प्रवास करून सर्वात आधी मुळा धरणातील पाणी पोहोचण्याचा अंदाज आहे, तर सर्वात शेवटी २२५ कि.मी.चा प्रवास करून जवळपास ३८ तासांत गंगापूर आणि दारणा धरणातील पाणी जायकवाडीत येणे अपेक्षित असल्याचे पाटबंधारे विभागातर्फे सांगण्यात आले. त्यामुळे जायकवाडीत मुळा धरणाचे पाणी शुक्रवारी दुपारपर्यंत पोहोचेल. त्यानंतर सायंकाळपर्यंत उर्वरित धरणांचे पाणी पोहोचेल, अशी शक्यता आहे.पाणी चोरीची भीतीजायकवाडी धरणात पाणी पोहोचण्यापूर्वी नगर, नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी अनधिकृतरीत्या खेचले जाते. त्यामुळे नदीलगतच्या भागांमध्ये पोलीस प्रशासनाच्या मदतीने प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मोटारींद्वारे पाणी चोरीला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्युत पुरवठा बंद ठेवून खबरदारी घेण्यात येत आहे; परंतु डिझेल मोटारींद्वारे पाणी शेततळे, विहिरीत वळविण्याच्या प्रयत्नांमुळे जायकवाडीत येणाऱ्या पाण्यात मोठी घट होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.पाण्याचे चित्रीकरणवरच्या धरणांतून पाणी सोडण्यापूर्वी आणि प्रवास सुरू झाल्यानंतर चित्रीकरण करण्यात येत आहे. प्रत्येक धरणावर चार जणांचे पथक देखरेख करण्याचे काम करीत आहे. यामध्ये पाण्याची पातळी, पाण्याचा होणारा विसर्ग यांच्या नोंदी घेण्याचे काम केले जात आहे. ऊर्ध्व भागातील धरणांपासून ते पैठण धरणापर्यंत विविध ठिकाणी पाणी मोजण्यात येणार आहे. मराठवाड्याला हक्काचे पूर्ण पाणी सोडले जाईल, यावर पाटबंधारे विभागाकडून करडी नजर ठेवली जात आहे.जायकवाडीत २९.६२ टक्के पाणीसाठागतवर्षी शंभर टक्के भरलेल्या जायकवाडी धरणात गुरुवारी २९.६२ टक्के पाणीसाठा होता. वरच्या धरणांतून येणाºया पाण्यामुळे किमान काही प्रमाणात जायकवाडीच्या पाणीपातळीत वाढ होणार आहे. त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळेल.तीन कारणांनी पाण्याचे नुकसानजायकवाडीसाठी सोडलेल्या पाण्यापैकी काही पाण्याचे तीन कारणांनी नुकसान होऊ शकते. यात नदीपात्रातील जमिनीत पाणी मुरते. ऊन आणि हवेचादेखील परिणाम होतो. मोटारी लावून पाणी चोरण्याची शक्यताही नाकारता येत नाही. हे सगळे धरून किमान ६.१० टीएमसी पाणी जायकवाडीत येईल, अशी आशा आहे, असे जलतज्ज्ञ शंकर नागरे म्हणाले.६ टीएमसी अपेक्षितयंदा पावसाळा लवकरच संपला आहे. दीड महिन्यापासून पाऊस नसल्याने नदीचे पात्र बºयाच ठिकाणी कोरडे झाले आहे. वाळूच्या उपशामुळे अनेक ठिकाणी खड्डे पडलेले असतात. या सगळ्या कारणांमुळे किमान ५ ते ६ टीएमसी पाणी जायकवाडीत येणे अपेक्षित आहे.-अजय कोहिरकर, कार्यकारी संचालक, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ

टॅग्स :WaterपाणीDamधरण