शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
3
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
4
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
5
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
6
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
7
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
8
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
9
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
10
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
11
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
12
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
13
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
14
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
15
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
16
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
17
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
18
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
19
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
20
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक

सौभाग्याचं लेणं! संक्रांतीसाठी औरंगाबादेत आल्या ६ ट्रक भरून बांगड्या

By प्रशांत तेलवाडकर | Published: January 10, 2023 8:00 PM

महिला हिरव्या, लाल रंगाच्या बांगड्या खरेदी करीत आहे. मात्र, पिवळ्या रंगाची बांगडीला हातही लावत नाही.

औरंगाबाद : वर्षातील पहिला संक्रांत हा खास महिलांचा सण... सौभाग्याचं लेणं म्हणून प्रत्येक महिला नवीन बांगड्या खरेदी करतातच. यासाठी उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथून चक्क ६ ट्रक बांगड्या (अडीच लाख डझन) शहरात आल्या आहेत. मात्र, महिला बांगड्या खरेदीसाठी येतात, त्यात ‘पिवळ्या’ रंगाची बांगडी नको गं बाई, असे म्हणत आहेत.

महिला का पिवळ्या बांगड्यांना हात लावेनात?महिला हिरव्या, लाल रंगाच्या बांगड्या खरेदी करीत आहे. मात्र, पिवळ्या रंगाची बांगडीला हातही लावत नाही. कारण यंदा संक्रांत पिवळ्या रंगावर आहे, असे महिला सांगत असल्याचे बांगड्या विक्रेत्यांनी सांगितले.

चायना पॉलिश बांगड्या सुपरहिटकाचेच्या बांगड्या फिरोजाबादमध्ये तयार केल्या जातात. तेथील उद्योजकांनी चीनमधून मशिन आणल्या आहेत. काचेच्या बांगड्यावर चमक येण्यासाठी या मशिनमध्ये ठेवल्या जातात. त्यावर ॲटोमॅटिक स्प्रे मारला जातो. यामुळे बांगड्या पूर्वीपेक्षा जास्त चमकदार, पॉलिश केल्यासारख्या दिसतात. याच ‘चायना पॉलिश’ बांगड्या सुपरहिट ठरत आहेत.

प्लास्टीक बांगडी मुंबई, तर मेटल दिल्ली, कोलकाताकाचेच्या बांगड्या फिरोजाबादहून येतात, पण प्लास्टीकच्या बांगड्या मुंबई, तर मेटलच्या बांगड्या दिल्ली व कोलकात्याहून मागविल्या जातात. काचेच्या बांगड्यांचीच सर्वाधिक विक्री होते.

बांगड्यांनी दिला दीड हजार लोकांना रोजगारशहरातील दीड हजार लोक बांगड्यांच्या व्यवसायात आहेत. संक्रात व लग्नसराईत बांगड्यांची सर्वाधिक विक्री होते. या व्यवसायात ७ होलसेल विक्रेते, ३०० दुकानदार, ५०० फेरीवाले व ७०० जण घरगुती व्यवसाय करीत आहेत. पुरुषांच्या बरोबरीने महिलाही बांगड्यांचा व्यवसाय करीत आहेत. बांगड्यांना या दीड हजार परिवारांना रोजगार मिळवून दिला आहे.

अडीच लाख डझन बांगड्याशहरात अडीच लाख डझन बांगड्या आणण्यात आल्या आहेत. यातील १ लाख डझन बांगड्या ग्रामीण भागात विक्रीला पाठविण्यात आल्या आहेत.

संक्रांत पिवळ्या रंगावरयंदा संक्रांतीचे वाहन वाघ आणि उपवाहन घोडा आहे. ही संक्रांत कुमारी अवस्थेतील असून, पिवळे वस्त्र नेसलेली आहे. दक्षिणेकडून उत्तरेकडे जात आहे. ईशान्य दिशेस पाहत आहे. पिवळ्या रंगाने रंगवलेल्या वस्तू परिधान करू नये, पण नैसर्गिक पिवळ्या रंगाच्या वस्तू, अलंकार चालतील. या वर्षी वाण देणे घेणे हळदी-कुंकू यासाठी पर्वकाळ सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत आहे.- वे.शा.सं. सुरेश केदारे गुरुजी

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMakar Sankrantiमकर संक्रांती