भारत दाढेल । लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जिल्ह्यातील स्वयंसहाय्यता महिला बचत गटांचे कर्ज प्रकरणे दोन वर्षापासून धूळ खात पडून असतानाच २०१७- १८ या वर्षासाठी ६१ लाख ६० लाखांचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे़ एकीकडे ६५४ गटांचे १० कोटी ९० लाखांचे प्रस्ताव प्रलंबित असताना नवीन उद्दिष्ट आल्यामुळे ‘जुनेच आले न हाती, नव्याची आशा कशाला’, अशी म्हणण्याची वेळ बचत गटांवर आली आहे़ महिला बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी बँकांच्या असहकार्यामुळे खीळ बसली आहे़ ग्रामीण भागातील महिलांच्या बचत गटांना कर्ज पुरवठा करण्यासाठी दरवर्षी शासनाकडून उद्दिष्ट देण्यात येते़ २०१६- १७ यावर्षी केवळ १८१ दारिद्र्य रेषेखालील बचत गटांना २ कोटी १० लाख ६१ हजार रूपयांचा कर्ज पुरवठा करण्यात आला़ ८०० बचत गटांचे प्रस्ताव प्रलंबीत असल्याने १२ कोटी रूपयांचे वितरण या गटांना होऊ शकले नाही़ जिल्ह्यातील १२६ विविध बँक शाखेत डीआरडीच्या बचतगटांचे कर्ज प्रकरणे पडून आहेत़ या गटांना कर्ज पुरवठा करण्यास बँकांची तयारी नाही़ सीईओ अशोक शिनगारे यांनी मागील वर्षी आयसीआयसीआय बँकेसोबत ७०० बचत गटांना ८ कोटींचे कर्ज वाटप करण्याचा करार केला होता़
बचत गटांसाठी ६१ लाखांचे उद्दिष्ट
By admin | Published: June 24, 2017 12:14 AM