शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ११ वाळूपट्ट्यांतून ६५ हजार ब्रास वाळू मिळणार

By विकास राऊत | Published: January 18, 2024 6:26 PM

वाळू खरेदीसाठी ग्राहकांना सेतू सुविधा केंद्रात २५ रुपये शुल्क देऊन नोंदणी करावी लागेल.

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील फुलंब्री, पैठण व वैजापूर तालुक्यांतील एकूण ११ वाळूपट्ट्यांतून ६५,३२७ ब्रास वाळू उपलब्ध होणार असून, नागरिकांना आता स्वस्तात वाळू मिळेल. त्यांना सेतू केंद्रात नोंदणी करावी लागेल, असे खनिकर्म अधिकारी किशोर घोडके यांनी कळविले. १३ वाळूपट्ट्यांतील ६ डेपोंसाठी निविदा काढल्या होत्या. ज्यात फुलंब्री, पैठण व वैजापूर तालुक्यांतील ११ पैकी ४ वाळू वाळूपट्ट्यांसाठी निविदा आल्या होत्या. 

फुलंब्री तालुक्यातील निमखेडा येथे गेवराई (गुंगी) येथे ६,०१३ ब्रास, पैठण तालुक्यात नांदर भाग १, भाग २, भाग ३, नवगाव भाग २ आणि ब्रह्मगाव येथील ब्रह्मगाव डेपोत सर्व घाट मिळून २३,५९२ ब्रास, सिल्लोड तालुक्यात धानोरा वाळूपट्ट्याच्या मोढा खु. डेपोवर ५,०८८ ब्रास, वैजापूर तालुक्यात पुरणगाव, भालगाव, अव्वलगाव, नागमठाण घाटावरील डाग पिंपळगाव डेपोवर ३०,६३४ ब्रास वाळू उपलब्ध झाली आहे. नोंदणी झाल्यानंतर बुकिंग आयडीची पावती वाळू डेपोवरील मॅनेजरला देऊन वाहतूक पावती घ्यावी. डेपोपासून बांधकाम ठिकाणचा वाहतूक खर्च भरण्याची जबाबदारी नोंदणी केलेल्या व्यक्तीची राहील. वाळूची मागणी नोंदविल्यानंतर १५ दिवसांच्या आत डेपोमधून वाळू नेणे बंधनकारक असेल.

सेतू सुविधा केंद्रात करावी लागेल नोंदणीवाळू खरेदीसाठी ग्राहकांना सेतू सुविधा केंद्रात २५ रुपये शुल्क देऊन नोंदणी करावी लागेल. रेशन कार्ड, आधार कार्ड, घरकुल प्रमाणपत्रासह मोबाइल क्रमांक लागेल. घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना ५ ब्रास वाळू मोफत मिळेल. इतरांसाठी ६०० रुपये अधिक १० टक्के डीएमएफ ६० रुपये अधिक एसआय चार्ज १६ रुपये एकूण ६७७ रुपये लागतील. तसेच ५२ रुपये प्रतिब्रास किमतीने एका कुटुंबास एका वेळी कमाल १० ब्रास इतक्या मर्यादेत वाळू मिळेल. त्यानंतर वाळू हवी असल्यास वाळू मिळाल्याच्या तारखेपासून एक महिन्यानंतर ग्राहकास वाळूची मागणी करता येईल.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादsandवाळूRevenue Departmentमहसूल विभाग