औरंगाबाद : आलिशान डेक्कन ओडिसी शुक्रवारी (दि 13) सकाळी रेल्वे स्थानकात दाखल झाली. या रेल्वेतून 66 ब्रिटिश पर्यटक डॉक्टरांसह आले. दिलीप खंडेराय ग्रुपच्या वतीने पर्यटकांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. त्यानंतर पर्यटक ट्रॅव्हल्सने वेरूळला रवाना झाले.
कोरोना व्हायरसची भीती पसरली असल्याने अनेक पर्यटक विदेशी दौरा रद्द करत आहेत. त्यात डेक्कन ओडिसीने 76 पर्यटक येणार होते. परंतु 10 पर्यटकांनी प्रवास रद्द केल्याने केवळ 66 पर्यटक डेक्कन ओडिसीतुन आले. या पर्यटकांची दिल्लीत स्क्रिनिंग झालेली आहे. शिवाय सोबत डॉक्टर आहेत इथेही वापरण्यात येणाऱ्या वाहनांना सॅनिटाईज केल्या असल्याचे स्थानिक समन्वय जसवंतसिग राजपूत यांनी सांगितले. तर पर्यटकांसोबत असलेले डॉ. फैजल बेग म्हणाले, आम्ही प्रत्येक स्टॉपवर स्क्रीनिंग करतोय, त्याशिवाय रेल्वेत प्रवेश नाही शिवाय पर्यटकांनाही संपर्क, हस्तांदोलन टाळण्याचे सांगितले आहे.
दरम्यान, डेक्कन ओडिसिने किती पर्यटक येत आहेत त्यांची स्क्रीनिंग कोण करणार किंवा करण्यात येईल का यासंबंधी आरोग्य विभागाला विचारले असता जिल्हा रुग्णालयाने महापालिका आणि महापालिकेने जिल्हा रुग्णलायाकडे बोट दाखवले. दरम्यान, पर्यटक वेरुळकडे रवाना झाले.