लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात सात महिन्यांमध्ये ६७ शेतकºयांनी आत्महत्येसारखा अखेरचा पर्याय निवडला असून मागील काही वर्षांपासून सुरु असलेले आत्महत्येचे सत्र यावर्षी देखील सुरुच असल्याचे दिसत आहे.दोन वर्षापूर्वी जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. अनियमित आणि सरासरीपेक्षा कमी पाऊस होत असल्याने शेती तोट्यात गेली. तीन वर्षापूर्वी तर खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामात शेतकºयांना उत्पन्न मिळाले नाही. मागील वर्षी बºयापैकी पाऊस झाल्याने येथील कृषीक्षेत्रात समाधानाचे वातावरण असले तरी नापिकी, कर्जबाजारीपणा आदी कारणांमुळे शेतकºयांच्या होणाºया आत्महत्या थांबल्या नसल्याचे दिसत आहे.यावर्षी देखील प्रत्येक महिन्यात किमान ४ पेक्षा अधिक शेतकºयांच्या आत्महत्या झाल्या आहेत. विशेष म्हणजे यावर्षी सुरुवातीच्या काळात बºयापैकी पाऊस झाला. परंतु, त्यानंतर पावसाने दडी मारली. परिणामी शेतकºयांच्या चिंता वाढत गेल्या आहेत. यावर्षीची स्थिती आणखीच गंभीर आहे. जानेवारी महिन्यापासून ते जुलै महिन्यापर्यंत जिल्ह्यातील ६७ शेतकºयांनी आत्महत्या केल्या असून त्यापैकी ४८ शेतकºयांच्या आत्महत्या शासनाच्या मदतीला पात्र ठरल्या आहेत. आणखी तीन प्रकरणे प्रलंबित आहेत. एकूण शेतकºयांच्या आत्महत्येच्या संख्येवरुन मागील काही वर्षांच्या तुलनेत यावर्षीही परिस्थिती बदलली नसल्याचे दिसत आहे.
सात महिन्यांत ६७ शेतकरी आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2017 11:56 PM