छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात ६३.०७ टक्के मतदान झाल्याची अंतिम आकडेवारी प्रशासनाने जाहीर केली आहे. २०१९ च्या तुलनेत ०.४१ टक्क्यांनी मतदान घटले आहे. मतदारांमधील निरुत्साह, पोलचिट न मिळणे, मतदान केंद्र बदलणे, यादीत नाव नसणे, स्थानिक नागरी समस्यांकडे राजकीय नेते लक्ष देत नसल्याच्या रागाचा परिणाम म्हणून मतदानाचा टक्का घटल्याचे दिसते आहे. सलग तीन दिवस आलेल्या सुट्यांमुळे मतदारांनी ‘हॉलिडे एंजॉय’ केल्याचेदेखील बोलले जात आहे. प्रशासनाने मतदान वाढविण्यासाठी अनेक प्रयत्न केले; परंतु मागील निवडणुकीपर्यंतचा टक्काही गाठता आला नाही.
महिलांचे मतदान ५ टक्क्यांनी कमी६५.८६ टक्के म्हणजेच १० लाख ७७ हजार ८०९ पैकी ७ लाख ९ हजार ८१६ पुरुष मतदारांनी मतदान केले.६०.०१ टक्के म्हणजेच ९ लाख ८१ हजार ७७३ पैकी ५ लाख ८९ हजार १८४ महिला मतदारांनी मतदान केले.
५.८४ टक्के महिलांचे मतदान कमी झाले.३ लाख ९२ हजार ५८९ महिलांनी मतदान केले नाही.३ लाख ७६ हजार ९९३ पुरुष मतदारांनी मतदान केले नाही.
विधानसभानिहाय मतदानाची टक्केवारीविधानसभा...................मतदानाची टक्केवारी........................किती वाढ / घट२०२४...................................................२०१९..................................कन्नड.............. ६६.७८................... ६४.८० टक्के...................... १.९८ टक्के घटऔरंगाबाद मध्य......... ६०.४०................... ६२.१९ टक्के............................ १.७९ टक्के घटऔरंगाबाद पश्चिम.......... ६०.५८.................. ६२.७८ टक्के....................... २.०२ टक्के घटऔरंगाबाद पूर्व........... ६१.११..................... ६२.८० टक्के........................ १.६९ टक्के घटगंगापूर............ ६५.४४............................... ६५.८९ टक्के................. ०.४५ टक्के वाढवैजापूर .............. ६४.८०..................... ६२.०७ टक्के..................२...७३ टक्के घटसरासरी.........६३.०७ टक्के...................एकूण ६३.४८ ....................०.४१ टक्के घट
गेल्या तीन निवडणुकांत किती झाले मतदान?२००९ : ५१.५६ टक्के२०१४ : ६१.०४ टक्के२०१९ : ६३.४८ टक्के
२०१९ साली कशी होती मतदानाची स्थिती?एकूण मतदार : १८ लाख ५९ हजारझालेले मतदान: ११ लाख ९५ हजार ४४२पुरुष : ९ लाख ७९ हजार ३२१महिला : ८ लाख ७९ हजार ६७९नवीन मतदार : १ लाख ९६ हजार ९६३मतदान केंद्र : १८५
२०२४ साली असलेली मतदानाची स्थितीएकूण मतदार : २० लाख ५९ हजार ७१०झालेले मतदान: १२ लाख ९९ हजार ४०
पुरुष : १० लाख ७७ हजार ८०९महिला : ९ लाख ८१ हजार ७७३
नवीन मतदार : १ लाख ११ हजारमतदान केंद्र : २०४०
५ वर्षांत मतदारसंघातील बदलमतदारसंघात २ लाख ७१० मतदार वाढले.किती वाढले महिला मतदार ?: १ लाख २ हजार ९४
किती वाढले पुरुष मतदार? : ९८ हजार ४८८
२०१४ साली काय स्थिती होती?२०१४ साली १५ लाख ३७ हजार ७०८ मतदार होते.२०१९ साली १८ लाख ८६ हजार २९४ मतदार झाले.३ लाख ४८ हजार ५८६ मतदार वाढले. मात्र त्या तुलनेत मतदान वाढले नव्हते.
६ लाख ५८ हजार १६७ पुरूष ....५ लाख ३७ हजार ७० महिला मतदारांनी मतदान केले होते. .मागील तीन निवडणुकींचा मतदानाचा आलेख२००९ साली ९ लाख ७६ हजार ११० मतदान झाले होते. २००४ च्या तुलनेत १ लाख १३ हजार मतदान जास्त झाले होते.२०१४ साली ११ लाख ९५ हजार २४२ मतदान झाले. २ लाख १९ हजार १३२ मतदान या निवडणुकीत जास्त झाले.२०२४ साली १२ लाख ९९ हजार ४० मतदान झाले होते. २०१९ च्या तुलनेत १ लाख ३ हजार ७९८ मतदान वाढले.