पैठण : नाशिक व जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचे पाणी जायकवाडीत दाखल होत असून, दोन दिवसांत धरणाच्या पाणी पातळीत सव्वादोन फुटांनी वाढ झाली आहे.सध्या धरणात १४,७७४ क्युसेक्स क्षमतेने पाण्याची आवक सुरू असून, धरणात ६.७१ टक्के जलसाठा झाला आहे. एकूण जलसाठा ८८२.४४७ द.ल.घ.मी. एवढा झाला असून, यापैकी १४४.३४१ द.ल.घ.मी. उपयुक्त जलसाठा असल्याचे धरण नियंत्रण कक्षातून सांगण्यात आले.नाशिक जिल्ह्यातील दारणा धरणातून ४०४० क्युसेक्स विसर्ग करण्यात येत आहे. नांदूर-मधमेश्वर प्रकल्पातून ६४५६ क्युसेक्स विसर्ग सुरू असल्याने जायकवाडीत पाण्याची आवक सुरू आहे. गेल्या २४ तासांत भंडारदरा- ३७ मि.मी., निळवंडे- २७ मि.मी., गंगापूर- ०७ मि.मी. व नाशिक- ७ मि.मी. अशी नगण्य नोंद झाली आहे. १५२२ फूट जलक्षमता असलेल्या धरणात आज दुपारी १४९७.४३ एवढी पाणी पातळी झाली होती. दरम्यान, नाशिक व नगर जिल्ह्यातील धरणात जलसंचय पातळी वाढविण्यात भर देण्यात येत असल्याने जायकवाडीकडे येणाऱ्या पाण्याचा ओघ घटला आहे. (वार्ताहर)
जायकवाडीत ७ टक्के साठा
By admin | Published: August 03, 2014 12:52 AM