छत्रपती संभाजीनगर : सहायक प्राध्यापकासाठी आवश्यक असलेली राज्य पात्रता परीक्षा (सेट) रविवारी शहरातील २१ केंद्रांवर झाली. सकाळी १० ते ११ आणि दुपारी ११:३० ते १:३० अशा दोन सत्रात ही परीक्षा घेण्यात आली. एकूण ९ हजार २३६ परीक्षार्थी या परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ७ हजार ७८८ परीक्षार्थींनी (८४.४३ टक्के) ही परीक्षा दिली, तर १ हजार ४४८ परीक्षार्थी गैरहजर राहिले.
परीक्षार्थींनी परीक्षा सुरू होण्यापूर्वी केंद्रांवर उपस्थित राहावे, अशी सूचना होती. प्रत्यक्षात अनेक विद्यार्थी परीक्षेचा वेळ सुरू झाल्यानंतर केंद्रांवर पोहोचत होते. त्याबरोबर एकाच नावाच्या महाविद्यालयात मात्र आर्ट्स, काॅमर्स, सायन्स, ज्युनिअर, सिनिअर अशी वेगवेगळी केंद्रे शोधताना परीक्षार्थींची दमछाक होताना दिसली.