लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कॉन्फेडरेशन आॅफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन आॅफ इंडिया (क्रेडाई) या संघटनेच्या स्थानिक शाखेच्या वतीने क्रांतीचौक येथील मॅनोर लॉन्स येथे ‘ड्रीम होम’ प्रदर्शन भरविण्यात आले आहे. प्रदर्शनाच्या तीन दिवसांत सुमारे सात हजारांपेक्षा अधिक लोकांनी भेट दिली. गृहेच्छुकांचा वाढत्या प्रतिसादाने बांधकाम क्षेत्रात उत्साहाचे वातावरण तयार झालेआहे.क्रेडाईच्या या ‘ड्रीम होम’ प्रदर्शनात ६० पेक्षा अधिक बांधकाम व्यावसायिकांचे रिअल इस्टेट रेग्युलेशन अॅक्ट (रेरा) नुसार नोंदणी केलेल्या २५० गृहप्रकल्पांत सुमारे २ हजार युनिट (फ्लॅट, रो-हाऊस, बंगलोज्, दुकान, भूखंड) येथे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यात काही पूर्ण बांधकाम झालेले तर काही बांधकाम सुरू असलेले प्रकल्प आहेत. तसेच भूमिपूजन झालेल्या प्रकल्पांची माहितीही येथे दिली जातआहे.शुक्रवारी आणि शनिवारी प्रदर्शनाला सकाळी ९.३० वाजेपासून प्रदर्शनात ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. बांधकाम व्यावसायिकांकडून येणाºया ग्राहकांची संगणकीकृत नोंदणी केली जात होती.तीन दिवसांत प्रदर्शन पाहण्यासाठी आले होते. दिवसभरात ३ हजार लोकांची नोंद झाली. प्रत्येक जण आपल्या बजेटनुसार घरांची माहिती घेत होता. चोखंदळपणे सर्व माहिती जाणून घेताना ग्राहक दिसून आले.प्रदर्शनात आलेले सुमारे ७० टक्के लोक सहपरिवार होते. सर्व मिळून माहिती घेत होते. त्यांना तेवढ्याच तत्परतेने बिल्डर्सकडील कर्मचारी माहिती देताना दिसूनआले.गृहप्रकल्प ‘रेरा’मध्ये नोंदणी केलेला आहे का, असे स्पष्टपणे ग्राहक विचारत होते. यामुळे कायद्याबद्दल समाजामध्ये किती जागरूकता निर्माण झाली, याची चुणूक येथे बघावयास मिळाली.
७ हजारांपेक्षा जास्त लोकांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 12:08 AM