शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

‘आरटीओ’मध्ये ७० पैकी निरीक्षकांची ५८ पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 10:53 PM

आरटीओ कार्यालयात ३० मोटार वाहन निरीक्षक आणि ४० सहायक मोटार वाहन निरीक्षकांची पदे मंजूर आहेत. प्रत्यक्षात ७० पैकी केवळ १२ पदांवर अधिकारी कार्यरत आहेत. तब्बल ५८ पदे रिक्त आहेत. त्यामुळे कार्यालयातील कामकाज विस्कळीत होत असून, अपघात विश्लेषण समितीच्या उद्देशालाही ‘खो’ बसत आहे.

ठळक मुद्देकेवळ १२ अधिकारी : अपघात विश्लेषण समितीच्या उद्देशाला ‘खो’

औरंगाबाद : आरटीओ कार्यालयात ३० मोटार वाहन निरीक्षक आणि ४० सहायक मोटार वाहन निरीक्षकांची पदे मंजूर आहेत. प्रत्यक्षात ७० पैकी केवळ १२ पदांवर अधिकारी कार्यरत आहेत. तब्बल ५८ पदे रिक्त आहेत. त्यामुळे कार्यालयातील कामकाज विस्कळीत होत असून, अपघात विश्लेषण समितीच्या उद्देशालाही ‘खो’ बसत आहे.आरटीओ कार्यालयात सध्या ७ मोटार वाहन निरीक्षक आणि ५ सहायक मोटार वाहन निरीक्षक असे केवळ १२ अधिकारी आहेत. शिकाऊ वाहन परवाना, पक्का वाहन परवाना, वाहनांचे फिटनेस, नवीन वाहन नोंदणी, भरारी पथक, विविध शासकीय बैठका अशी विविध कामांची जबाबदारी मोठी कसरत करून त्यांना पार पाडावी लागत आहे. अपघातांवर उपाययोजना शोधण्यासाठी अपघात विश्लेषण समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. या समितीमध्ये आरटीओ निरीक्षक, पोलीस निरीक्षक आणि बांधकाम विभागाचे उपअभियंता यांचा सामावेश आहे. या समितीने मृत्युमुखी अपघात स्थळाला भेट देऊन अपघातांची कारणे शोधून त्याचा अहवाल देणे अपेक्षित आहे. अपघात नेमका कशामुळे झाला, याचा शोध घेण्याबरोबर अपघात होऊ नये, यासाठी उपाय सुचविण्याची जबाबदारी समितीवर आहे; परंतु सध्या आरटीओ कार्यालयात नियमित कामांनाही अधिकाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. त्यामुळे अपघातांचे विश्लेषण कसे करावे, असा प्रश्न अधिकाऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. परिणामी, या समितीचे कामकाज सध्या ठप्प झाले आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRto officeआरटीओ ऑफीस