शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ७० हजार नवमतदार पहिल्यांदाच करणार मतदान

By विकास राऊत | Published: September 06, 2024 8:26 PM

लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात एकूण २ हजार ८९८ मतदान केंद्र होते. आता ३६६ मतदान केंद्रांची भर पडली आहे.

छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. आचारसंहिता ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागेल, अशी चर्चा आहे. मतदारांची अंतिम यादी नुकतीच जाहीर झाली असून जिल्ह्यात नवमतदारांची संख्या ७० हजार २४२ वर गेली असून ते मतदार पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावतील.

जिल्ह्यात एकूण दिव्यांग मतदारांची संख्या २७ हजार १८८ आहे. लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात एकूण २ हजार ८९८ मतदान केंद्र होते. आता ३६६ मतदान केंद्रांची भर पडली आहे. एकूण मतदान केंद्र ३ हजार २६४ आहेत. सिल्लोड मतदान केंद्र ४०६ आहेत. कन्नड मध्ये ३६८, फुलंब्री ३७१, पैठण ३५१, गंगापूर ३७२, वैजापूर ३५३, औरंगाबाद मध्य ३२०, पश्चिम ४०१ तर पूर्व विधानसभा मतदारसंघात ३२२ मतदान केंद्र आहेत. अंतिम यादीनुसार जिल्ह्यात ३१ लाख ४५ हजार २०३ मतदार झाले आहेत. यात १६ लाख ३९ हजार ६४० पुरूष, १५ लाख ५ हजार ४२३ महिला तर १४० इतर मतदार आहेत. दुबार नावे, स्थलांतरीत अशा २० हजार ५४५ मतदारांची नावे यादीतून वगळली आहेत. तर २२ हजार ७३१ मतदारांच्या नावांमध्ये दुरुस्ती केली आहे. असे उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांनी सांगितले.

१८ ते १९ वयातील मतदार किती?सिल्लोड ९ हजार २२४,कन्नड ६ हजार ५८१,फुलंब्री ७ हजार ७२१,औरंगाबाद मध्य ८ हजार ४६०,पश्चिम ९ हजार २३९,पूर्व ७ हजार ३२९,पैठण ६ हजार ८८५,गंगापूर ७ हजार ९७०,वैजापूर ६ हजार ८३३

विधानसभानिहाय मतदार किती?विधानसभा - मतदार संख्यासिल्लोड                         - ३५०१६४कन्नड                         - ३२८१९५फुलंब्री                         - ३६३२९९पैठण                         - ३१९८१५गंगापूर                         - ३५७१९०वैजापूर                         - ३१५८७१औरंगाबाद मध्य             - ३६४२९१पश्चिम                         - ३९९३२५पूर्व                                    - ३४७०५३एकूण                         - ३१,४५,२०३

वयोगटानुसार जिल्ह्यातील एकूण मतदारवयोगट - मतदार संख्या१८ ते १९ - ७०२४२२० ते २९ - ६८२६९९३० ते ३९ - ७७६०५५४० ते ४९ - ६४०९८३५० ते ५९ - ४७०७१६६० ते ६९ - २७४७०५७० ते ७९ - १५०४८८८० वर्षांवरील - ७९३१५एकूण मतदार -३१४५२०३

टॅग्स :Electionनिवडणूक 2024Votingमतदानvidhan sabhaविधानसभाAurangabadऔरंगाबाद