मुंबई/औरंगाबाद : विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील ७१ तालुक्यांची स्थिती पुरेशा पावसाअभावी चिंताजनक झाली आहे. मराठवाड्यातील तब्बल ३० तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने उर्वरित ४६ तालुक्यांत दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.पावसाळा सुरू होऊन ३८ दिवसांचा कालावधी झाला असून, मराठवाड्यात केवळ १२ दिवस पावसाने हजेरी लावली आहे. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मंगळवारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत आढावा घेतला.विभागात ७७९ मि.मी.पैकी २४७ मि.मी. पाऊस होणे अपेक्षित होते. आजवर १२५.८१ मि.मी. इतका पाऊस झाला आहे.।मराठवाड्यासह विदर्भात १८पासून पाऊसमराठवाड्यासह विदर्भात १८ जुलैनंतर पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. १८ जुलै रोजी कोकण-गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल. १९ जुलै - कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडेल. २० जुलै - कोकण, गोवा, विदर्भात बहुतांश ठिकाणी, मराठवाड्यात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविला आहे.
७१ तालुक्यांना पावसाची प्रतीक्षा, मराठवाड्यात चिंताजनक स्थिती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 5:49 AM