शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
2
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
3
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
6
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
7
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
8
"अपने साथी शहीदों में शामिल...", हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!
9
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
10
हिजबुल्लाहच्या नसरल्लाहचा 'खात्मा'; आता खामेनेईंचं टेनन्शन वाढलं; इस्रायलवर भडकले अन् अंडरग्राउंड झाले!
11
"महालक्ष्मी ब्लॅकमेल करत होती, म्हणून ५९ तुकडे..."; बंगळुरू हत्येतील आरोपीच्या भावाचा मोठा दावा
12
“ठाकरे गटाला महाविकास आघाडीत फक्त ४४ जागा मिळतील”; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
13
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
14
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
15
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
16
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून १०१ पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
17
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
18
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात
19
“...तर शरद पवारांच्या इशाऱ्यावर मनोज जरांगे मराठा आंदोलन करत होते स्पष्ट”: प्रकाश आंबेडकर
20
देशातील टॉप १० श्रीमंत देवस्थानांच्या यादीत राम मंदिर; किती कोटींचे दान मिळाले? आकडा पाहाच

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अकरावीच्या ४४४ महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी ७२ हजार जागा

By राम शिनगारे | Published: May 30, 2024 8:24 PM

मिशन ॲडमिशन; केंद्रीय नव्हे महाविद्यालय पातळीवरच होणार प्रवेश, विद्यार्थ्यांसह पालकांची प्रवेशासाठी धावपळ

छत्रपती संभाजीनगर : दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावीच्या प्रवेशाची धावपळ सुरू झाली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यातील ४४४ उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये तिन्ही शाखांना तब्बल ७२ हजार ८६० जागा उपलब्ध आहेत. त्यात शहरातील ११९ उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांचा समावेश असून, खासगी शिकवणी लागण्यासाठी विद्यार्थ्यांचा ओढा ग्रामीण भागाकडेच असल्याचेही समोर आले आहे.

अकरावीच्या प्रवेशासाठी मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक शहरांमध्ये ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केल्यानंतर केंद्रीय पद्धतीने प्रवेश देण्यात येत आहे. या प्रक्रियेमध्ये छत्रपती संभाजीनगर शहराचाही समावेश होता. मात्र, उपलब्ध असलेल्या जागांएवढीही नोंदणी ऑनलाइन पद्धतीने होत नव्हती. त्यामुळे ही प्रक्रिया बंद केलेली आहे. त्यानंतर आता प्रत्यक्ष महाविद्यालय पातळीवरच प्रवेश करण्यात येतात. दहावीचा निकाल २७ मे रोजी लागल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. जून अखेरपर्यंत प्रवेश प्रक्रिया चालणार असून, जुलैमध्ये नियमित तासिकांना सुरुवात होईल. जिल्ह्यात अकरावीच्या तिन्ही शाखांच्या ७२ हजार ८४० जागा उपलब्ध आहेत. त्याचवेळी दहावीच्या परीक्षेत जिल्ह्यातून ६२ हजार ८५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे अकरावी प्रवेशाच्या १० हजार जागा शिल्लक राहणार आहेत. त्यातच दहावीनंतर पॉलटेक्निक, आयटीआयलाही शेकडो विद्यार्थी प्रवेश घेतात.

जिल्ह्यात शाखानिहाय प्रवेश क्षमताशाखा.......अनुदानित...................विनाअनुदानित.......एकूणकला..........१२,८०........................१६,४८०................१७,७६०वाणिज्य.....२८००..........................४६८०..................७४८०विज्ञान........१३,२००........................२२,८४०..............३६,०४०एकूण.........२८,८६०........................४४,०००..............७२,८६०

महाविद्यालयाच्या पातळीवरच प्रवेश प्रक्रियाशहरासह जिल्ह्यातील उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील प्रवेशांना सुरुवात झालेली आहे. महाविद्यालयाच्या पातळीवरच ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्याठिकाणीच नियमानुसार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतील. सुरुवातीला अनुदानित जागेवर गुणवत्तेनुसार प्रवेश दिले जातील. त्यानंतर विनाअनुदानित जागेवर विद्यार्थ्यांचे प्रवेश होतील.- अनिल साबळे, शिक्षण उपसंचालक, छत्रपती संभाजीनगर

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEducationशिक्षणcollegeमहाविद्यालय