शहरं
Join us  
Trending Stories
1
घोळ संपेना! मविआचा नवा फॉर्म्युला, तिघांना प्रत्येकी ९० जागा; १८ जागा मित्र पक्षांना
2
३६ जागांवर महायुती अन् मविआचेही ‘वेट अँड वॉच’; एकमेकांच्या उमेदवारांची प्रतीक्षा
3
राजकारणातील सर्वच पुतण्यांचा DNA एकसारखाच, अडचणीत आणाल तर...- छगन भुजबळ
4
राहुल नार्वेकरांच्या मालमत्तेत चार कोटींची वाढ; पाच वर्षात आशिष शेलारांची संपत्तीत किती वाढली?
5
रांगोळीवरही निवडणुकीचा रंग! पालघरमधील सफाळेत मतदान जनजागृतीचे अनोखे आवाहन
6
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
7
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
8
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
9
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
10
बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते
11
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)
12
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
13
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
14
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
15
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
16
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
17
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
18
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
19
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...

मराठवाड्यात अतिवृष्टीने ७४२ कोटी रुपयांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 3:33 PM

मुख्यमंत्री शिंदे यांच्या घोषणेकडे शेतकऱ्यांचे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठवाडा मागील तीन वर्षांपासून अतिवृष्टीचा सामना करीत आहे. यंदाही आजवरच्या पावसामुळे ७४२ कोटी रुपयांचे नुकसान अतिवृष्टीमुळे झाले आहे. ३० व ३१ जुलै असे दोन दिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठवाड्याच्या राजधानीत आहेत. विभागीय आयुक्तालयात होणाऱ्या आढावा बैठकीत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर हे विभागातील खरीप पीक नुकसानीसह बाधित झालेल्या पायाभूत सुविधांचा अहवाल सादर करणार आहेत. शेती नुकसानभरपाईसाठी ३०८.८ कोटी, बाधित पायाभूत सुविधांच्या दुरुस्तीसाठी ४३३.६४ कोटी असा ७४२.४४ कोटींची मागणी केली जाणार आहे.

३१ जुलै रोजीच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री शिंदे विभागाला काय मदत करणार याकडे लक्ष लागले आहे. यंदाच्या आजवरच्या पावसाळ्यात अतिवृष्टी व पुरामुळे ६ लाख २७ हजार ६१४ शेतकऱ्यांचे ४ लाख ३८ हजार १२.४१ हेक्टरातील पिकाचे नुकसान झाले आहे, तर दीड हजार हेक्टर शेतजमीन खरडून गेली आहे. या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून, मोबदल्यासाठी ३०८.८ कोटींचा निधी लागणार आहे, तर नांदेडमधील पायाभूत सुविधांच्या दुरुस्तीसाठी ४३३.६४ कोटी लागेल, असा अहवाल रविवारी विभागीय आयुक्त कार्यालयात मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या आढावा बैठकीत सादर केला जाईल.

मराठवाड्यात मागील चार वर्षांपासून जास्तीच्या पावसाची हजेरी लागत आहे. त्यामुळे वारंवार अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाला फटका बसत आहे. यंदा तर जुलैमध्येच शेती पिकाचे नुकसान झाले आहे. केवळ ६ ते २४ जुलै दरम्यान झालेल्या पावसामुळे जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड आणि लातूर या सहा जिल्ह्यांत खरीप पिकाला फटका बसला आहे. तीन वर्षांत ९ हजार ३१६ कोटी रुपयांची नुकसानभरपाई शासनाने विभागाला द्यावी लागली. 

तीन वर्षांत ९ हजार ३१६ कोटींची नुकसानभरपाई 

वर्ष : २०१९ n    बाधित क्षेत्र : ४१ लाख ५३ हजार २२३.३० हेक्टरn    शेतकरी संख्या : ४४ लाख ३३ हजार ५४९ n    दिलेली मदत : ३१००.६१ कोटी

वर्ष :२०२०n    बाधित क्षेत्र : २५ लाख ४७ हजार ६४०.५३ हेक्टरn    शेतकरी संख्या : ३६ लाख ७३ हजार ३४४ n    दिलेली मदत : २६३१.५९ कोटी

वर्ष : २०२१ n    बाधित क्षेत्र : ३६ लाख ५२ हजार ८७२.९५ हेक्टरn    शेतकरी संख्या : ४४ लाख ४७ हजार १६१ n    दिलेली मदत : ३५८५.४२ कोटी

 

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडा