लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने गत २४ तासांत जिल्ह्यात काही ठिकाणी हजेरी लावली असून ७़५५ मि़मी़पावसाची नोंद झाली आहे़ आतापर्यंत सरासरी १८९़७१ मि़मी़पाऊस झाला़गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिली होती़ त्यामुळे बळीराजावर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे़ अनेक तालुक्यांमध्ये तर शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली़ मृग नक्षत्रात जोरदार हजेरी लावलेल्या पावसाने अचानक दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे़ त्यात गेल्या दोन दिवसांपासून काही ठिकाणी हलक्या सरी कोसळत आहेत़ गत २४ तासांत जिल्ह्यात ७़५५ मि़मी़पाऊस झाला़ त्यात नांदेड-१३़१३, मुदखेड-३, अर्धापूर- ८़३३, भोकर-७़५०, उमरी-७, कंधार-१०़६७, लोहा-९, किनवट-३, माहूर-१़६३, हदगाव-११़२९, हिमायतनगर-१५, देगलूर-३़८३, बिलोली-६़६०, धर्माबाद-१०़६७, नायगाव-४़६०, मुखेड-५़५७ मि़मी़पावसाची नोंद झाली आहे़ शुक्रवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते़ दुपारी चार वाजेच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरीही कोसळल्या़
जिल्ह्यात ७़५५ मि़मी़पाऊस
By admin | Published: July 15, 2017 12:21 AM