लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेमध्ये अर्ज दाखल केलेल्या शेतकºयांच्या याद्यांचे चावडी वाचन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सुमारे ७५० अधिकारी आणि कर्मचाºयांची नियुक्ती केली आहे.मागील वर्षी जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यापूर्वी देखील सलग दोन वर्षे पावसाच्या अनियमिततेमुळे शेतकरी आर्थिक पेचात सापडल्याने राज्य शासनाने थकबाकीदार शेतकºयांचे दीड लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. थकबाकीदार शेतक्यांनी कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी आॅनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक होते. यासाठी २२ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील महा ई-सेवा केंद्रावरुन हे आॅनलाईन अर्ज भरण्यात आले आहेत.अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून आता प्रत्यक्ष कर्जमाफीची प्रक्रिया सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर ज्या शेतकºयांचे अर्ज आॅनलाईन दाखल झाले आहेत, अशा शेतकºयांच्या याद्या जिल्हा प्रशासनाने तयार केल्या आहेत. तालुकानिहाय आणि गावनिहाय याद्यांचे काम पूर्ण झाले असून १ व २ आॅक्टोबर रोजी या याद्यांचे प्रत्यक्ष चावडी वाचन केले जाणार आहे. या चावडी वाचना दरम्यान शेतकºयांना काही शंका असतील तर त्याही विचारता येणार आहेत. त्यामुळे चावडी वाचनाची ही प्रक्रिया सुरु झाली असून चावडी वाचन करण्यासाठी प्रशासनाने जिल्ह्यात सुमारे ७५० अधिकारी आणि कर्मचाºयांची नियुक्ती केली आहे.जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये हे चावडी वाचन करण्यासाठी ६७९ अधिकारी आणि कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात तलाठी, ग्रामसेवक, गटसचिव, कृषी सहाय्यक आदी अधिकारी- कर्मचाºयांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच चावडी वाचनाच्या दरम्यान ९४ पर्यवेक्षकही नियुक्त केले आहेत. सहायक निबंधक, सहकार निबंधक, तहसीलदार, नायब तहसीलदार, कृषी पर्यवेक्षक, मंडळ अधिकारी आदी अधिकाºयांना पर्यवेक्षणाची जबाबदारी देण्यात आली आहे. या सर्व अधिकारी आणि कर्मचाºयांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून १ आॅगस्ट रोजी प्रत्यक्ष गावात जाऊन चावडी वाचन होणार आहे.
चावडी वाचनासाठी ७५० कर्मचारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 12:04 AM