लातूर : संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने पाणीसाठे पिण्यासाठी आरक्षित केले असून, सिंचन, महानगरपालिका, तहसील, महावितरण यांच्या संयुक्त पथकाने गेल्या दोन दिवसांपासून आरक्षित पाणीसाठ्यांवरील वीज मोटारींचे कनेक्शन तोडण्यास प्रारंभ केला आहे़ आतापर्यंत ७५२ कनेक्शन तोडण्यात आले आहेत़ जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे़ दरम्यान, जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी मांजरा नदीवरील बॅरेजेस व भंडारवाडी प्रकल्पातील उपलब्ध पाण्याची पाहणी केली आहे़जिल्हाभरात येणाऱ्या काही दिवसात पाणीटंचाईची भीषण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे़ त्यामुळे प्रशासनाने उपाययोजना करण्यास प्रारंभ केला असून, कानडी बोरगाव ते नागझरीपर्यंत असलेल्या मांजरा नदीवरील बॅरेजेसच्या पाण्यावर ज्या वीज मोटारी आहेत, त्या मोटारींचे कनेक्शन तोडण्यात आले आहे़ कानडी बोरगाव ते नागझरी बॅरेजेस पर्यंत ५२७ वीज मोटारी होत्या़ या सर्व मोटारींचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला आहे़ शिवाय भंडारवाडी प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रात २२५ वीज मोटारी आहेत़ या वीज मोटारींचाही विद्युतपुरवठा संयुक्त पथकाने खंडीत केला आहे़ त्याचबरोबर रायगव्हाण, तावरजा प्रकल्पावरीलही वीज मोटारींचा पुरवठा खंडीत करण्यात आला असून वांजरखेडा, सारसा-पोहरेगाव, वाकडी-वांगदरी, नागझरी या बॅरेजेसवरील वीज मोटारींचा पुरवठा खंडीत करण्यात आला आहे़ महसूल, पंचायत समिती, महानगरपालिका, महावितरण यांच्या संयुक्त पथकाचे त्यावर नियंत्रण असून पाणी आरक्षित केलेल्या पाणी साठ्यावर या पथकाची नजर आहे़ विशेष म्हणजे, भंडारवाडी प्रकल्पांतर्गत असणाऱ्या ट्रान्सफार्मरवरचाच विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आल्यामुळे या प्रकल्पावरील वीज मोटारींचा वीज पुरवठा आपोआपच खंडीत झाला आहे़ या सर्व प्रकलपांतील उपलब्ध पाणी गतवर्षीच्या तुलनेत कमीच आहे, तरीही संभाव्य टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने हे नियोजन केले आहे़ अंजनपूर, कानडी-बोरगाव बॅरेजेसवर अंबाजोगाई तालुक्यातील काही शेतशिवार सिंचनाखाली आहे़ त्यामुळे तेथील तहसीलदारांनाही वीज मोटारीवरील कनेक्शन तोडण्यासंदर्भात विनंती करण्यात आली असल्याची माहिती, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ़विश्वंभर गावंडे यांनी दिली़ जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, पंचायत समितीचे बीडीओ, महावितरणचे अधीक्षक अभियंत्यांना या संदर्भात निर्देश देण्यात आले आहेत़ त्यानुसार जिल्ह्यातील १० ही तालुक्यात आरक्षित पाणीसाठ्यावर संयुक्त पथकाचे नियंत्रण राहणार आहे़ सूचना करुनही वीज मोटार सुरु राहिल्यास त्या जप्त करण्याचे आदेश संबंधितांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी डॉग़ावंडे यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)गतवर्षांपासून प्रकल्पात पाणी कमी आहे़ त्यामुळे काही कनेक्शन गतवर्षीच बंद झाले आहेत़ गेल्या दोन दिवसांपासून कनेक्शन तोडण्यात येत असून जिल्हा अधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार आतापर्यंत ७५२ कनेक्शन तोडण्यात आले असल्याचे महावितरणे अभियंता सुरेश फेरे यांनी सांगितले़ ४प्रकल्पातील उपलब्ध पाणी रबी ज्वारी व चारावर्गीय पिकांसाठीही आरक्षित करण्यात आले आहे. मात्र पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट होणार असल्याने जास्तीत जास्त पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे. रेणापूर तालुक्यातील भंडारवाडी प्रकल्पातील तसेच मांजरा नदीवरील बॅरेजेसमधील उपलब्ध पाणी केवळ आणि केवळ पिण्यासाठीच आरक्षित राहील, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांचे आहेत.
७५२ कनेक्शन तोडले !
By admin | Published: November 10, 2014 11:44 PM