शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"आपण *** मारायची आणि दुसऱ्याचं..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
4
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
5
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
6
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
7
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
8
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
9
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
10
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
11
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
12
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
13
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
14
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
15
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
16
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
17
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
18
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
19
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
20
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला

जायकवाडीत ७७% जलसाठा

By admin | Published: October 05, 2016 1:01 AM

पैठण : जायकवाडी धरणात आवक वाढल्याने गेल्या २४ तासांत धरणातील जलसाठ्यात पावणेदोन टीमसीने वाढ झाली आहे. मंगळवारी धरणात १९६५४ क्युसेक क्षमतेने आवक सुरू असून

पैठण : जायकवाडी धरणात आवक वाढल्याने गेल्या २४ तासांत धरणातील जलसाठ्यात पावणेदोन टीमसीने वाढ झाली आहे. मंगळवारी धरणात १९६५४ क्युसेक क्षमतेने आवक सुरू असून, धरणात ७७% जलसाठा झाला असल्याचे धरण नियंत्रण कक्षातून धरण अभियंता अशोक चव्हाण यांनी सांगितले.नगर जिल्ह्यातील मुळा धरणातून ४३०० क्युसेक व ओझर वेअरमधून ४५७ क्युसेक एवढा विसर्ग प्रवरा नदीत करण्यात येत आहे. देवगड येथील सरिता मापन केंद्रावर प्रवरा नदी ११९४५ क्युसेक क्षमतेने वाहत असल्याचे सहायक अभियंता आर. ई. चक्रे यांनी सांगितले. देवगड येथून हे पाणी अवघ्या १५ मिनिटांत जायकवाडी धरणात दाखल होते.नाशिक जिल्ह्यातून एकत्रित विसर्ग नांदुर-मधमेश्वर धरणातून ५५९५ क्युसेक क्षमतेने गोदावरी पात्रात करण्यात येत आहे. गोदावरी वैजापूर तालुक्यातील नागमठाण येथील सरिता मापन केंद्रावर ७६०० क्युसेक क्षमतेने वाहत असल्याचे सहायक अभियंता बी. आर. थोरात यांनी सांगितले.जायकवाडी धरणात मंगळवारी सायंकाळी ७७% जलसाठा झाला होता. १५२२ फूट जलक्षमता असलेल्या धरणाची पाणी पातळी मंगळवारी सायंकाळी ६ वाजता १५१७.३४ फुटापर्यंत पोहोचली होती. धरण पूर्णक्षमतेने भरण्यासाठी आता केवळ ४.६६ फूट पाणीपातळीत वाढ होणे गरजेचे आहे. धरणात एकूण जलसाठा २३९३.४५३ दलघमी (८४.५१ टीएमसी) झाला आहे. यापैकी जिवंत जलसाठा १६५५.३४७ दलघमी ( ५८.४५ टीएमसी ) एवढा झाला आहे . जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणारी धरणे जवळपास १००% भरलेली आहेत. यात करंजवन, दारणा, भंडारदरा, ओझरखेड, मुळा, वाघाड, तीसगाव, कश्यपी, कडवा, बाहुली, वालदेवी, वाकी ही धरणे १००% भरलेली आहेत.