छत्रपती संभाजीनगर : सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील २६ लाख ४९ हजार ५६६ शेतकऱ्यांचे २१ लाख १९ हजार ४१५ हेक्टरवरील खरीप पिकांचे, फळबागांचे नुकसान झाले. आजवर यातील १९ लाख ८५ हजार ६६२ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या १६ लाख ५४ हजार ७३६.८१ हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. ७८.०८ टक्के हे प्रमाण आहे.
छत्रपती संभाजीनगर व बीड जिल्हा मागे असून या जिल्ह्यात ४५ टक्के पंचनामे झाल्याचे प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीतून दिसते आहे. नांदेड जिल्ह्यात जिल्ह्यातील ५ लाख ३२ हजार ९९९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले. परभणी जिल्ह्यातील बाधित क्षेत्र ३ लाख ५१ हजार ५७८ हेक्टर, हिंगोलीतील २ लाख ८६ हजार १४४, लातूर १ लाख ९५ हजार ७५४, जालना २ लाख १२ हजार ४६६, छत्रपती संभाजीनगर १ लाख ७७ हजार ७१५, बीड जिल्ह्यात ३ लाख ५६ हजार ६९१ तर धाराशिव जिल्ह्यातील ६ हजार ६७ हेक्टर क्षेत्र बाधित झाले. अतिवृष्टीमध्ये २० लाख ७१ हजार ९२१.८९ हेक्टरवरील जिरायत, २६ हजार ३४९ क्षेत्रावरील बागायत तर २१ हजार १४४.३ हेक्टरवरील फळपिकांना फटका बसला.
कोणत्या जिल्ह्यात किती नुकसान.......
जिल्हा ................ बाधित शेतकरी....... बाधित क्षेत्र ...... पंचनामे झालेले क्षेत्र ....... टक्केवारीछत्रपती संभाजीनगर.......... ३१७४६८........... १७७७१५.०७ ............ ७५३५४.०७ ........... ४२.४०
जालना............... २५४१२७ ............. २१२४६६.७२ .................. १३९२५३.५१ .......... ६५.५४ परभणी ............ ४५९०१२............... ३५१५७८................. ३४०४०८ .......................... ९६.८२
हिंगोली .............. २८१६८८ ............... २८६१४४.३ .............२८६१४४.३ ........... १०० नांदेड ................. ६८२२६४ ................... ५३२९९९ ..............४६५२२४ ............. ८७.२८
बीड ............... ३९७७५३ ................... ३५६६९१ ................ १५२३१०.०६ ............. ४२.७० लातूर .............२५०७१४ ................. १९५७५४.१० ................ १९०७०६.८३ ............. ९७.४२
धाराशिव .................. ६५४० ............. ६०६७ ................ ५३३६ ................... ८७.९५
एकूण .............. २६४९५६६ .............. २११९४१५.१९ ........... १६५४७३६.८१...............७८.०८