शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सूनच नाही तर सासूलाही करता येणार कौटुंबिक हिंसेविरोधात तक्रार, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय  
2
गजकेसरी, लक्ष्मी नारायण राजयोगात अक्षय्य तृतीया: ८ राशींना अक्षय्य लाभ, यश-प्रगती; शुभ घडेल!
3
बीडमध्ये महिला वकिलाला वळ उठेपर्यंत मारहाण! काँग्रेसचे सरकारला चॅलेंज- "पूर्णवेळ गृहमंत्री असेल तर..."
4
जन्मताच पैसे कमवायला सुरुवात! वर्षात ११ कोटींची कमाई; १७ महिन्यांचे बाळ २१४ कोटींचे मालक
5
आता या सगळ्यांना पोहोचवण्याची वेळ आलेली आहे! मृत्यूच्या खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर भडकले आदेश बांदेकर
6
मराठी अभिनेत्रीने सांगितला विराट कोहलीसोबत शूटिंगचा अनुभव, म्हणाल्या, "माझ्या मुलीसाठी त्याने..."
7
केएल राहुल-अथिया शेट्टीच्या लेकीचं झालं बारसं! नाव काय ठेवलं माहितीये? शब्दाला आहे खास अर्थ
8
सोन्याच्या किमतीचा नवा विक्रम! १० ग्रॅमसाठी तुमच्या शहरातील नवीन दर जाणून घ्या
9
"क्रिकेटपटूंनी विवस्त्र फोटो पाठवले, शिविगाळ केली, एकाने तर…’’, मुलगी बनलेल्या अनाया बांगरचे सनसनाटी आरोप 
10
सासू जावयानंतर आता बिर्याणीवाला...; कामावर ठेवलेला पोरगाच मालकाच्या पत्नीला पळवून घेऊन गेला
11
बदल्याची आग! उपचाराच्या बिलामुळे झाला कर्जबाजारी, रुग्णालयात चोरी करणारा हायटेक चोर
12
एसबीआयमध्ये १००००० रुपयांवर मिळतंय २४,६०४ चे निश्चित व्याज; एफडीचा कालवधी किती?
13
मोठी बातमी: अपघातग्रस्त रुग्णांवर १ लाखापर्यंत कॅशलेस उपचार करा; बैठकीत आरोग्यमंत्र्यांचे निर्देश
14
"मुख्यमंत्री महोदय, हे फोटो पाहूनही तुम्हाला झोप कशी लागते?"; रोहिणी खडसे यांचा संताप
15
Video - संतापजनक! सर्दीच्या उपचारासाठी आलेल्या मुलाला डॉक्टरने दिलं सिगारेट ओढण्याचं ट्रेनिंग
16
वरमाला पडली अन् नवरदेवाने दिलेले दागिनेच खोटे निघाले; मग काय नवरीने...
17
मुंबई: शेअर मार्केटमध्ये नुकसान झाले अन् तरुणाने स्वतःच्या गळ्यावर झाडली गोळी, किती लाख बुडाले?
18
पोलिसांचा पुन्हा 'वाल्मीक पॅटर्न'?; फरार PSI कासले काल स्वत:हून पुण्यात आला, अन् आज अटक झाली!
19
बुलढाणा: केसगळतीनंतर आता ‘नखगळती’; ४६ जण बाधित; शेगाव तालुक्यातील ५ गावांत लक्षणे
20
शिक्षक भरती घोटाळ्यात मंत्रालयातील अधिकारी? गुन्हे दाखल करण्याची मागणी

उद्या मतदाना दिवशी जिल्ह्यातील ८ कृषी उत्पन्न बाजार समित्या, १४ आठवडी बाजार बंद राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 19:45 IST

धान्याची २५ कोटींची उलाढाल राहणार ठप्प

छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा सोमवारी संपला. बुधवारी (दि.२०) मतदान आहे. या दिवशी जिल्ह्यातील ८ कृषी उत्पन्न बाजार समित्या व १४ आठवडी बाजार बंद ठेवण्यात येणार आहेत. धान्य ते कटलरीपर्यंत सुमारे २५ कोटींची उलाढाल यानिमित्ताने ठप्प होईल.

लोकशाहीत मतदान करण्याचा हक्क सर्वांना दिला आहे. १०० टक्के मतदान होण्यासाठी प्रशासनापासून ते राजकीय पक्षांपर्यंत सर्वजण प्रयत्न करीत आहेत. मतदानापासून कोणी वंचित राहू नये, यासाठी निवडणूक आयोगाने उद्योग, व्यवसाय बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. ग्रामीण भागाचा आर्थिक कणा असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीचे आता ‘मतदान केंद्रात’ रुपांतर झाले आहे. तर आठवडी बाजारामुळे मतदानावर परिणाम होऊ नये म्हणून बुधवारी भरणारे जिल्ह्यातील सर्व बाजार बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.

८ बाजार समित्यांची इमारत निवडणूक आयोगाच्या ताब्यात

जिल्ह्यात जाधववाडी येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीचा ताबा निवडणूक आयोग मंगळवारी सकाळपासून घेणार आहे. इमारतीसमोर मंडप उभारण्यात आला आहे. याशिवाय पैठण, फुलंब्री, गंगापूर, कन्नड, लासूर स्टेशन, सिल्लोड, वैजापूर या कृषी उत्पन्न बाजार समितीतही मतदान केंद्र असल्याने बुधवारी बंद राहणार आहे.

जिल्ह्यात आहेत ९२ आठवडी बाजारछत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ९२ आठवडी बाजार भरतात. प्रत्येक लहान-मोठ्या आठवडी बाजारात ५० लाख ते १ कोटीपर्यंतची उलाढाल होते.

मतदानाच्या दिवशी कोणते आठवडी बाजार राहणार बंद

तालुका----- गावाचे नाव१) छत्रपती संभाजीनगर : लाडसावंगी, चित्तेपिंपळगाव, आडगाव सरक.

२) गंगापूर : लिंबजळगाव.३) कन्नड : चापानेर, नागापूर.

४) पैठण : बिडकीन, दावरवाडी.५) सिल्लोेड : शिवणा, आमठाणा.

६) फुलंब्री : बाबरा.७) वैजापूर : लोणी खु., परसोडा

८) खुलताबाद : खुलताबाद

कोणत्या तालुक्यात किती आठवडी बाजार ?१) छत्रपती संभाजीनगर शहर, तालुका : १२

२) गंगापूर : ८३) कन्नड : १५

४) पैठण : १३५) सिल्लोड : १३

६) फुलंब्री : ९७) वैजापूर : ११

८) सोयगाव : ५९) खुलताबाद : ६

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर