वाळूज महानगर : रांजणगाव ग्रामपंचायतीचा ८३२ कारखान्यांकडे ८ कोटीचा कर थकीत असून, आतापर्यंत केवळ १२६ कारखानदारांनी जवळपास ३ कोटी रुपयाचा कर भरला आहे. थकीत कराचा भरणा करण्यासाठी कारखानदार टाळाटाळ करीत असल्याने ग्रामपंचायतीचे बजेट कोलमडले असून, विकास कामे रखडल्याचा आरोप केला जात आहे.
वाळूज उद्योगनगरीतील अर्थिकदृष्टया संपन्न म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रांजणगाव शेणपुंजी ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात लहान-मोठे ९५८ कारखाने आहेत. चालु अर्थिक वर्षात या कारखान्याकडे ९ कोटी ८८ लाख ३ हजार ३ रुपयांचा कर थकीत आहे. या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात येणाºया १२६ कारखान्यांनी नोव्हेंबर अखेरपर्यंत २ कोटी ८७ लाख १ हजार ७०० रुपयाचा कर ग्रामपंचायतीकडे भरला आहे.
ग्रामपंचायतीने उर्वरित संबंधित कारखानदारांना कराचा भरणा करण्यासाठी वेळोवेळी नोटिसा बजावल्या आहेत. मात्र, बहुतांश कारखानदार कर भरण्यास टाळाटाळ करीत असल्याने या ग्रामपंचायतीचे बजेट कोलमडले आहे. परिमाणी गावातील विकास कामे रखडली असून, गावातील नागरिकांच्या रोषाला ग्रामपंचायत पदाधिकाºयांना सामारे जावे लागत आहे. उद्योनगरीत रोजगारांची संधी उपलब्ध झाल्यामुळे देशाच्या विविध भागांतून आलेले कामगार गावात स्थायिक झाले आहेत. या कामगारामुळे गावाची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून, नागरी सुविधा पुरविताना ग्रामपंचायत प्रशासनाची दमछाक होत आहे.
शासनाच्या विविध योजना तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीकडून मिळणारा निधी लोकसंख्येच्या तुलनेत कमी पडत असल्यामुळे गावातील विकास कामांना ब्रेक लागत आहे. किमान नागरी सुविधा मिळविण्यासाठी नागरिकांना संघर्ष करावा लागत असून, पुरेशा निधीअभावी गावातील विकास कामे रखडली आहेत.
विकास कामांवर होतोय परिणामग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात येणाºया ९५८ पैकी ८३२ कारखान्यांनी ग्रामपंचायतीचा ७ कोटी ७९ लाख ३१ हजार ८३५ रुपयाचा कर थकविला आहे. शासन नियमानुसार कर आकारणी करुनही कारखानदार टाळाटाळ करीत असल्याने थकबाक वाढतच आहे. परिणामी गावातील विविध विकास कामांवरही विपरीत परिणाम होत आहे.
जप्तीची मोहिम राबविणारग्रामपंचायतीचा थकीत कर भरण्यास कारखानदार टाळाटाळ करीत असल्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाच्यावतीने जप्तीची मोहिम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात थकबाकीदार कारखानदारांना नोटीसा बजावून कराचा भरणा लवकर न केल्यास पोलिस बंदोबस्तात जप्तीची मोहिम राबवून कारखान्याची यंत्र सामुग्री जप्त केली जाणार असल्याची माहिती प्रभारी सरपंच मोहनीराज धनवटे, ग्रामविकास अधिकारी एस.एन.रोहकले यांनी दिली.--------------------------------------