औरंगाबाद : मराठवाड्यातील आठ खेळाडूंची महाराष्ट्राच्या १४ वर्षांखालील संभाव्य क्रिकेट संघात निवड झाली आहे. अंतिम संघ निवडण्यासाठी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे उद्यापासून पुणे येथे सामने खेळवले जाणार आहेत.निवड झालेल्या संभाव्य संघात औरंगाबादचा तनुज साळुंके, जालना येथील हृषिकेश काणे, बीड येथील सचिन धस, निखिल कुकडे, शिवराज शेळके, उस्मानाबाद येथील अनुराग कवडे, आदिनाथ पोरबलकर आणि नांदेड येथील वेगवान गोलंदाज मिर्झा बेग यांचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे नुकत्याच झालेल्या १४ वर्षांखालील निमंत्रित संघांच्या स्पर्धेत औरंगाबादच्या तनुज साळुंके याने सुरेख गोलंदाजी करताना १४ बळी घेतले होते. त्याचप्रमाणे उस्मानाबादविरुद्ध नवव्या क्रमांकावर फलंदाजीस येऊन ६0 धावांची खेळी करणाºया हृषिकेश काणे याने गोलंदाजीतही आपला विशेष ठसा उमटवताना ५ गडी बाद केले होते. जालना संघाविरुद्ध अनुराग कवडे व आदिनाथ पोरबलकर यांनीही प्रभावी कामगिरी केली होती, तर मिर्झा बेग याने एडीसीए स्टेडियमवर झालेल्या औरंगाबाद विरुद्धच्या लढतीत एकूण ९ बळी घेत आपला ठसा उमटवला होता. संभाव्य संघात निवड झालेल्या तनुज साळुंकेला प्रशिक्षक दीपक पाटील यांचे मार्गदर्शन लाभले आहे. मिर्झा बेग याला प्रशिक्षक मोईन यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या निवडीबद्दल औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष राम भोगले, उपाध्यक्ष नरेंद्र पाटील, पारस छाजेड, सचिव सचिन मुळे, सहसचिव शिरीष बोराळकर, कोषाध्यक्ष सुभाष पटेल आणि विभागीय सचिव प्रदीप देशमुख यांनी खेळाडूंचे अभिनंदन करीत त्यांना शुभेच्छा दिल्या.
मराठवाड्याचे ८ खेळाडू महाराष्ट्राच्या १४ वर्षांखालील संभाव्य संघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 1:06 AM
मराठवाड्यातील आठ खेळाडूंची महाराष्ट्राच्या १४ वर्षांखालील संभाव्य क्रिकेट संघात निवड झाली आहे. अंतिम संघ निवडण्यासाठी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे उद्यापासून पुणे येथे सामने खेळवले जाणार आहेत.
ठळक मुद्देतनुज, हृषिकेश, सचिन, निखिल, शिवराज, अनुराग, आदिनाथ यांचा समावेश